Sayali Sanjeev Comeback : ‘काहे दिया परदेस’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव. सायलीला या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील भूमिकेने सायलीने रसिकांच्या मनात घर केलं. अभिनेता ऋषि सक्सेनाबरोबर या मालिकेतील सायलीची जोडी चांगलीच गाजली होती. यानंतर सायली मराठी सिनेमांमधून प्रेक्षकांना भेटत होती. पण आता ती पुन्हा टीव्हीविश्वात कमबॅक करणार असल्याच्या चर्चा आहेत. स्टार प्रवाहच्या आगामी पुरस्कार सोहळ्यात सायली डान्स परफॉर्मन्स करणार असल्याचं समोर आलं आहे. कारण स्टार प्रवाहच्या या पुरस्कार सोहळ्याच्या रिहर्सल दरम्यान सायली उपस्थित होती. आणि यावरुन असं समोर आलं आहे की, लवकरच सायली स्टारच्या आगामी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा येत्या काही दिवसात प्रसारित होणार आहे. सोहळा आधीच पार पडला असून या सोहळ्याचे काही प्रोमो आता समोर आले आहेत. यामध्ये सायली संजीवचाही डान्स परफॉर्मन्स आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये सायली असं म्हणत आहे की, “यंदा स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात मी परफॉर्म करत आहे. खूप एनर्जेटिक गाणं आहे. तसंच यातून मी या परिवाराशीही जोडली जात आहे याचा मला खूप आनंद होत आहे. माझ्या स्टार प्रवाहवरच्या सर्व अभिनेत्री मैत्रिणींबरोबर मला स्क्रीन शेअर करायला मिळणार आहे. यानिमित्ताने आम्ही महिला वर्गाला ऊर्जा देणारं गाणं डेडिकेट करणार आहे. माझी स्टार प्रवाहवर काम करण्याची खूप इच्छा आहे. ती लवकर पूर्ण होईल असं मला वाटतंय”.
आणखी वाचा – ज्युनिअर आर्टिस्ट ते अभिनेता बनण्याचं स्वप्न; कलाकार म्हणून असा घडत गेला ‘मैत्रीचा ७/१२’मधील सिद्धार्थ
तर इट्स मज्जा युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सायली असं म्हणाली की, “‘स्टार प्रवाह’ वाहिनीशी माझं नातं फार जुनं आहे. आणि अर्थात मला या वाहिनीबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली यासाठी मी खूप आभारी आहे. स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यामध्ये मला डान्स करायची संधी मिळत आहे. मला मुळात डान्स येत नाही, मला डान्सचा फोबिया आहे आणि तरीदेखील या स्टारच्या नायिकांबरोबर मला परफॉर्म करायला मिळतंय हे खूप छान आहे. स्टार प्रवाहच्या मालिकेत मला काम करायला नक्की आवडेल, माझी तर ही खूप इच्छा आहे आणि आता तुम्ही सुद्धा माझ्यासाठी मेनिफेस्ट करा”.
आणखी वाचा – “पत्रास कारण की…”, जवळच्या व्यक्तीचं पत्र ऐकताच रितेश देशमुखला अश्रू अनावर, व्हिडीओ पाहून उपस्थितही भावुक
पुढे ती म्हणाली, “या पफॉर्मन्सच्या निमित्ताने का होईना मी स्टार प्रवाह परिवाराशी जोडली जात आहे, सगळ्या माझ्या मैत्रीणींबरोबर एका मंचावर परफॉर्म करणार आहे त्यामुळे खूप छान वाटतंय. छोट्या पडद्यावर मला नकारात्मक भूमिका साकारायला आवडेल पण तशा भूमिका मला कोणी ऑफर करत नाही आहे त्यामुळे मी रोमँटिक भूमिकांना प्राधान्य देते”.