Savita Malpekar On New Celebrity : मराठी सिनेविश्वातील रोखठोक, बेधडक, करारी, व्यक्तिमत्त्व असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे सविता मालपेकर. सध्या सविता या मुलाखतींमध्ये सिनेविश्वाबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आल्या आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सविता या मराठी इंडस्ट्रीबाबत स्पष्ट मत मांडताना दिसत आहेत. गेली अनेक वर्षे त्या मराठी नाटक, टेलिव्हिजन मालिकांमार्फत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. सविता मालपेकर त्यांच्या प्रत्येक भूमिकेसाठी विशेष मेहनत घेऊन प्रेक्षकांचं मन नेहमीच जिंकून घेतात. त्या अतिशय स्पष्टवक्त्या, न पटणाऱ्या मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या आहेत. इंडस्ट्रीत होणाऱ्या गटबाजीबद्दल सविता यांनी केलेलं भाष्य विशेष चर्चेत आलं. इतकंच नव्हे तर कलाकारांच्या वागणुकीबद्दलही त्या स्पष्टपणे बोलताना दिसल्या.
नुकतीच सविता मालपेकर यांनी कलाकारांच्या संघटनेबाबत, गटबाजीबाबत ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं. याशिवाय नवोदित कलाकारांबाबतही सविता यांनी थेट भाष्य करत त्यांना सुनावलं असल्याचं पाहायला मिळालं. ज्येष्ठ कलाकारांना येऊन बोलणं हे सविता यांना खटकलं यावरुन त्यांनी एका नवोदित कलाकाराची चांगलीच शाळा घेतली असल्याचं त्यांनी नुकत्याच इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
आणखी वाचा – कॉलर पकडली, धमकी दिली अन्…; ‘तारक मेहता…’मधील जेठालाल व निर्मात्यामध्ये मोठा वाद, शोही सोडणार?
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “तुम्ही आता आमच्यावर जळत असाल ना?. एकतर तिची माझ्याबरोबर हे असं बोलण्याची हिंमत झाली. पण मी म्हटलं जाऊदेत बालिश आहे. मी म्हटलं का?, जळण्यापाठी कारण काय आहे?. मी कधीच स्पर्धा करत नाही, मी कोणाला कॉपी करत नाही. कारण काय तर, आता आम्हाला इव्हेंट मिळतात, पैसे मिळतात. पण ते तुम्हाला मिळत नव्हते. मी सर्व ऐकून घेतलं. आणि तिला म्हटलं आता मी बोलू का?. म्हटलं, तुम्ही भिकारी आहात. तुम्ही दळिद्री आहात, आम्ही श्रीमंत आहोत. का असंही विचार म्हटलं, कारण तुम्हाला पैसे मिळतात आणि आम्हाला जे मिळालं आहे ते तुम्हाला मिळालेलं नाही आहे. आणि ते मिळणार पण नाही, तर आता भिकारी कोण आहे तर तुम्ही आहात”.
आणखी वाचा – Navri Mile Hitlerla : बहिणीसाठी लीला एजेंच्या विरोधात जाणार, नात्यात पुन्हा दुरावा येणार, मोठा ट्विस्ट
त्या पुढे असंही म्हणाल्या आहेत की, “अशा माणसांबरोबर काम केलं आहे जे तुम्ही कधी करुच शकत नाही. मग मी श्रीमंत नाही का?. त्यावेळचे कलाकार पैशावर श्रीमंत नसतील, पण जी आम्ही पुंजी जमवली आहे त्यावर आम्ही ५० वर्षे काढली आहेत. तुम्हाला हे पैसे मिळतायत ते अभिनयाच्या जोरावर नाही तर सुपाऱ्यांच्या जोरावर मिळत आहेत. मी आजही सांगते की, मला पैसे घेऊन बोलावतात हे मला माहित नव्हतं”.