लग्नानंतर बहुतांश सगळी जोडपी ही हनिमूनला जातात. जेथे ते प्रेमाचे आणि एकत्र क्षण घालवतात. एकत्र फिरतात आणि निसर्गाचा आनंद घेतात. अशावेळी अनेक जोडपे हॉटेलमध्ये थांबतात. यादरम्यान त्यांच्यातील प्रेम आणखी बहरते. पण तुम्ही कधी अशा हॉटेलबद्दल ऐकले आहे का जिथे गेल्याने जोडप्यांचा घटस्फोट होतो. नेदरलँडमध्ये असं एक हॉटेल आहे जे ‘डिव्होर्स हॉटेल’ म्हणून ओळखले जाते. या हॉटेलमध्ये केवळ विवाहित जोडपेच बुकिंग करू शकतात आणि येथे येण्याचा उद्देश त्यांच्यातील नातेसंबंध संपवणे हाच असतो. (Divorce Hotel)
हे हॉटेल नेदरलँड्सच्या हार्लेम शहरात आहे. या हॉटेलला ‘द सेपरेशन इन’ असेही म्हणतात. ज्या जोडप्यांना वेगळे व्हायचे आहे, पण त्यासाठी लांब आणि कठीण कायदेशीर मार्ग पार करण्याचा कंटाळा आहे. अशा जोडप्यांना एकत्र आणून घटस्फोट घेणे अगदी सोपे करणे हा या हॉटेलचा मुख्य उद्देश आहे. या हॉटेलने एक वातावरण आणि एक अशी प्रणाली तयार केली आहे जी एकाच वेळी कायदेशीर सल्ला, मानसिक आधार आणि मध्यस्थी करते. जेणेकरून घटस्फोटाची प्रक्रिया कोणत्याही तणावाशिवाय जलद आणि शांततेने पूर्ण करता येते.
या हॉटेलमध्ये राहण्याचे मुख्य आकर्षण म्हणजे येथे येणाऱ्या जोडप्यांना घटस्फोटाच्या प्रक्रियेसाठी सहसा दीर्घ कायदेशीर लढा द्यावा लागत नाही. त्याऐवजी, या हॉटेलमध्ये घटस्फोटाची प्रक्रिया २४ तासांच्या आत पूर्ण होते. या हॉटेलमध्ये शांततापूर्ण आणि व्यावसायिक वातावरणात, दोघेजण एकाच ठिकाणी बसतात आणि मध्यस्थ, कायदेशीर सल्लागार व मानसशास्त्रज्ञ यांच्या मदतीने त्यांच्या नात्याला पूर्णविराम देतात. या हॉटेलमध्ये बुकिंग फक्त अशा जोडप्यांसाठी आहे जे विवाहित आहेत आणि त्यांनी लग्न संपवण्याचा निर्णय घेतला आहे.
आणखी वाचा – Navri Mile Hitlerla : बहिणीसाठी लीला एजेंच्या विरोधात जाणार, नात्यात पुन्हा दुरावा येणार, मोठा ट्विस्ट
या हॉटेलमध्ये जोडप्यांना त्यांच्या घटस्फोटाच्या प्रक्रियेत मदत करण्यासाठी व्यावसायिक सहाय्यही मिळते. हॉटेलमध्ये घटस्फोटादरम्यान, दोन्ही भागीदार एकत्र बसून प्रक्रिया समजून घेऊ शकतात आणि नंतर संमतीपत्रावर स्वाक्षरी करू शकतात, ज्यामुळे त्यांचे नाते कायदेशीररित्या संपुष्टात येते. यानंतर, एक कायदेशीर दस्तऐवज तयार केला जातो आणि दोन्ही भागीदार त्यांचे विवाह संपवू शकतात. जे त्यांच्यासाठी मानसिक आणि भावनिकदृष्ट्या एक मोठा दिलासा आहे.