‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. जहागीरदारांच्या घरी दिवाळी दणक्यात साजरी करण्यात आली. रेवती एजेला भाऊबीजेच्या भेटीमध्ये लीलाची काळजी घेण्यासाठी आणि ती आनंदात कशी राहील यासाठी प्रयत्न करण्याचे वचन मागते. इकडे श्वेता एजेसमोर विष प्यायल्याचं नाटक करते ज्यामुळे एजेला अटक होते. ही बातमी कळताच लीला ठरवते की ती काहीही करून एजेची सुटका कारायची आणि त्यानंतर लीला एजेंना सोडवून आणते. मालिकेच्या नुकत्याच झालेल्या भागात लीलाने एजेंणा दिलेला तिचा शब्द पाळला आहे आणि त्यांची सुखरूप सुटका करुन त्यांना घरी आणलं आहे. (Navri Mile Hitlerla Serial Update)
अशातच आता मालिकेला आणखी एक नवीन वळण आलं आहे ते म्हणजे रेवतीच्या लग्नाचे. लीलाने रेवतीला तिचे लग्न यशबरोबर लावून देणार असल्याचे वचन दिलं आहे. पण एजेंच्या मनात काही वेगळच आहे. श्वेताचे एजेंबरोबर लग्न ठरले होते, पण काही कारणांमुळे लीलाचे लग्न एजेंबरोबर होते. त्यामुळे आता एजे श्वेताबरोबर यशचे लग्न लावणार आहेत आणि याबद्दल लीलाला समजणार आहे. याचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
या नवीन प्रोमोमध्ये लीला यशला असं म्हणते की, “तुझं माझ्या बहीणीवर खरंच प्रेम आहे ना. तर तू एजेंना सगळं खरं सांग की, तुझं एका दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे”. यावर यश लीलाला असं म्हणते की, “एजेंना हे सांगायची हिंमत माझ्यात नाही. मी एजेंना यातलं काहीच सांगू शकत नाही”. यावर लीलाला असं म्हणते की, “रेवू माझी बहीण आहे. तिच्या बाबतीत मी तुला काय कुणालाच आयुष्य पणाला लावू देणार नाही. त्यासाठी मी एजेंच्या विरोधातही जायला तयार आहे”.
त्यानंतर लीला एजेंना जाब विचारायला जाते आणि असं म्हणते की, “तुम्ही श्वेताला न्याय देण्यासाठी यशवर अन्याय करत आहात”. यावर एजे लीलाला असं म्हणतात की, “तुला जे माहीत त्यात तू पडू नकोस”. यानंतर लीला एजेंना असं म्हणते की, “श्वेता कितीही चांगली असली तरी यशचं तिच्यावर प्रेम नाहीये. कारण यशचं मुळात दुसऱ्या कुणावर तरी प्रेम आहे”. हे ऐकताच एजेंना धक्का बसतो. त्यामुळे आता मालिकेत आणखी नवीन काय वळण येणार. बहिणीसाठी लीला एजेंच्या विरोधात जाणार का? हे आगामी भागात पाहायला मिळेल.