Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Dilip Joshi : छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ने गेल्या १६ वर्षामध्ये प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले आहे. २००८ मध्ये सुरु झालेल्या मालिकेमध्ये अनेक कलाकार सहभागी झाले, तर काहींनी काही कारणांमुळे मालिकेला राम रामही केला. टेलिव्हिजनच्या जगात प्रेक्षकांचा आवडता शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सध्या नकारात्मक कारणांमुळे चर्चेत आहे. सामाजिक नातेसंबंधांवर आधारित असलेल्या या शोची कथा सध्या कलाकार आणि निर्मात्यांमधील संघर्षांमुळे चर्चेत आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये जेठालाल चंपकलाल गडा यांची भूमिका साकारणारे दिलीप जोशी आणि शोचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यात कडाक्याचे भांडण झाल्याची बातमी समोर आली आहे.
‘न्यूज १८’च्या रिपोर्टनुसार, ही संपूर्ण घटना या वर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला घडली. वास्तविक हा वाद फी किंवा पैशावरुन नसून रजेवरुन झाला असल्याचे बोलले जात आहे. रजेबाबत दोघांमध्ये जोरदार वादावादी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. शोच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, दिलीप म्हणजेच जेठालाल यांनी असित मोदी यांच्याकडे शोमधून काही दिवसांची रजा मागितली होती, परंतु निर्मात्याने त्यांच्याशी संभाषण करणं पुढे ढकलले. या प्रकाराने जेठालाल चांगलाच संतापला. आणि त्यांच्यात बाचाबाची झाल्याचे वृत्त आहे.
शोच्या एका सूत्राने वेबसाइटला सांगितले की, तो दिवस कुश शाहच्या शूटिंगचा शेवटचा दिवस होता. ते म्हणाले की, इथे दिलीप जोशी निर्माते येण्याची वाट पाहत होते आणि त्यांच्या सुट्ट्यांबद्दल त्यांच्याशी बोलले, पण ते आले आणि थेट कुशला भेटायला गेले. यावरुन दिलीप जोशी निराश झाले आणि त्यांच्यात जोरदार वादावादी झाली.
आणखी वाचा – स्विमसूटमध्ये कॅमेऱ्यासमोर आली रणबीर कपूरची लेक, हेअरस्टाइलची रंगील सर्वाधिक चर्चा, क्युट फोटो व्हायरल
एवढेच नाही तर भांडण इतके वाढले की दिलीप जोशी यांनी त्यांची कॉलर पकडून शो सोडण्याची धमकीही दिल्याचे बोलले जात आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या १६ वर्षांपासून यशस्वीपणे सुरु आहे. दिलीप जोशी पहिल्या दिवसापासून या शोचा भाग आहेत. दिशा वकानी, राज अनाडकट, भव्य गांधी, गुरुचरण सिंह आणि जेनिफर मिस्त्री यांच्यासह शोमधील अनेक महत्त्वाच्या सदस्यांनी शो सोडला आहे.