मालिका, नाटक यांसारख्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. संकर्षणने आजवर त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. रंगभूमी गाजवणाऱ्या या अभिनेत्यांच्या यादीत संकर्षणचे नाव आवर्जून घेतले जाते. सध्या संकर्षण ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त असलेला पाहायला मिळत आहे. हे नाटक प्रेक्षकांच्या बरंच पसंतीस पडतानाही दिसत आहे. सर्वत्र या नाटकाची विशेष जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळत असून सध्या या नाटकाचे दौरे परदेशात सुरु असल्याचं दिसत आहे. (Sankarshan Karhade Enjoying At America)
अमेरिकेत या नाटकाची टीम रवाना झाली असून ती तिथं हाउसफुल प्रयोग करताना दिसत आहे. संकर्षणची या नाटकातील महत्त्वाची भूमिका पाहण्यासाठी त्याचे चाहते आवर्जून येताना दिसतात. सोशल मीडियावर संकर्षण बऱ्यापैकी सक्रिय असतो. काही महिन्यांपूर्वी आलेल्या या मालिकेतून संकर्षणने स्वतःच्या अभिनयाने प्रेक्षकांमध्ये एक वेगळी छाप पाडली. या मालिकेमुळे संकर्षण घराघरात पोहोचला. याशिवाय संकर्षणच्या कवितेचे ही लाखो चाहते दिवाने आहेत.

संकर्षणच्या कविता ऐकण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असलेले पाहायला मिळतात. सोशल मीडियावरुन तो त्याच्या चाहत्यांबरोबर नेहमीच अपडेट शेअर करत असतो काही दिवसांपूर्वीच संकर्षणने अमेरिका मधील एक फोटो शेअर करत सध्या तो अमेरिका दौरा करण्यात व्यस्त असल्याचे सांगितलं होतं. चाहत्यांशी तो नेहमीच मन मोकळेपणांने संवाद साधताना दिसतो. संकर्षण अमेरिकेत जाऊनही स्वतःला आनंद कसा मिळेल याचा विचार करताना दिसत आहे.
विशेषतः तो अमेरिकेत जाऊन मधल्या वेळेत गल्ली क्रिकेट खेळताना दिसतोय, त्यांने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर गल्ली क्रिकेट खेळतानाचा फोटो शेअर केला आहे, हे पाहून साऱ्यांनाच संकर्षणचं कौतुक वाटत आहे. कायमच प्रसिद्धी मिळाली तरी हवेत न रहाता जमिनीवर पाय ठेवून राहणारा असा हा संकर्षण त्याचा आनंद प्रत्येक बारीक बारीक गोष्टींमध्ये शोधताना दिसतो.