रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रतिमाला पाहून सुभेदार कुटुंबाला बसला मोठा धक्का, रविराजबरोबरही तिची भेट होणार का?, सर्वांना ती ओळखू शकेल का?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 27, 2024 | 9:56 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tharal Tar Mag Serial Update

प्रतिमाला पाहून सुभेदार कुटुंबाला बसला मोठा धक्का, रविराजबरोबरही तिची भेट होणार का?, सर्वांना ओळखू शकणार का?

‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, सायली कुठे गेली या काळजीत संपूर्ण सुभेदार कुटुंब असत. प्रतापच्या म्हणण्यानुसार अर्जुन पोलीस स्टेशनलाही जायला निघतो. त्याचवेळी सायली तिथे येते. सायलीला पाहून सगळे खुश होतात. तेव्हा सायली सांगते मी एकटी नाही तर मी कोणालातरी बरोबर घेऊन आलीआहे. यावर सायलीच्या काळजीपोटी अर्जुन चिडतो तर इकडे अस्मिता आश्रमातून कोणाला तरी आणले असल्याचे बोलते. सायली प्रतिमाला सगळ्यांसमोर उभी करते. कल्पना या बाई कोण आहेत अशी चौकशी करताच अर्जुन पुन्हा त्यांच्यावर चिडतो त्यावेळी प्रताप त्याला शांत करतो. (Tharal Tar Mag Serial Update)

अस्मिता प्रतिमाला तिथेच थांबायला सांगते. त्यावर पूर्णा आई अस्मिताला गप्प करते आणि पाहुण्या आहेत त्या असं म्हणते. प्रतिमाला आता सायली चेहरा दाखवायला सांगते. प्रतिमाचा चेहरा पाहून पूर्णा आईला मागच्या सर्व घटना आणि गोष्टी आठवतात. अर्जुनही प्रतिमाला पाहून सायलीला तुझा अंदाज बरोबर होता असं सांगतो. पूर्णा आई प्रतिमाला कडकडून मिठी मारतात. पण प्रतिमा सायलीच्या मागे लपते. प्रतिमाला पाहून कल्पनाही स्वप्न तर बघत नाही आहे ना असं म्हणते. प्रतापही प्रतिमाची कशी आहेस अशी विचारपूस करतो.

आणखी वाचा – अखेर आदित्यसमोर आलं लग्नाचं सत्य, पारूबरोबरच्या या नात्याला स्वीकारणार का?, मालिकेत नवं संकट

View this post on Instagram

A post shared by सीरियल जत्रा (@serialjatra)

अस्मिता मात्र तू जिवंत कशी आणि चेहऱ्यावर खुणा कसल्या असा उलट प्रश्न तिला विचारते. प्रतिमाला जवळ घ्यायला पूर्णा आई पुढे सरसावताच प्रतिमा मागे जाते. सायली प्रतिमाबद्दल सांगताच चैतन्य वअश्विन तिथे पोहोचतात. त्यांनाही प्रतिमाला पाहून धक्का बसतो. प्रतिमाला पूर्णा आई बोलायला तिच्याशी बोलायला सांगतात पण ती गप्पच असते.

आणखी वाचा – “२००७मध्ये त्या आजींनी माझ्यासाठी चांदीचं पान बनवलं अन्…”, प्रसाद ओकने सांगितला ‘त्या’ चाहतीचा किस्सा, म्हणाला, “त्या भेटल्या तेव्हा…”

आता मालिकेच्या पुढील भागात असे पाहायला मिळणार आहे की, रविराजला पूर्णा आई बोलावून घेते आणि इतक्या वर्षांचा चमत्कार घडल्याचे रविराजला सांगते. आता प्रतिमा समोर आल्याने मालिकेत कोणते नवे ट्विस्ट येणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Tags: marathi serialstar pravahtharal tar magTharal Tar Mag Serial Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Bigg boss Marathi New Entry

'बिग बॉस मराठी'च्या घरात प्रवेश करणार मराठी गायक व परदेसी गर्ल, प्रोमोने वेधलं लक्ष, पण हे आहेत तरी कोण?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.