शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : मेकअप रुम, आकर्षक इंटेरियर अन्…; इतकं मोठं व आलिशान आहे सई ताम्हणकरचं नवं घर, म्हणाली, “१५ वर्ष सतत काम केल्यानंतर…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 23, 2023 | 12:40 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
sai tamhankar new home

सई ताम्हणकरने खरेदी केलं नवीन घर

Sai Tamhankar New Home : मराठी चित्रपटसृष्टीमधील नावाजलेल्या अभिनेत्रींमध्ये मानाचं स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सईने मराठीमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांना आपलसं केलं. तिने अधिकाधिक मेहनत करत यशाचं शिखर गाठलं. ती इथवरच थांबली नाही. सईने बॉलिवूडकडे तिचा मोर्चा वळवला. बॉलिवूड चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका साकारत तिने पुरस्कारही पटकावला. आता सई स्वतःसाठी एक सुंदर आयुष्य जगत आहे. तिने स्वतःच्या हक्काचं आलिशान घर खरेदी केलं आहे. (Sai Tamhankar New Home video)

सईने स्वतःचं युट्युब चॅनल सुरु केलं आहे. याद्वारे तिने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये जुन्या घरामधून बाहेर पडताना सई रडताना दिसली होती. जुन्या घरामध्ये तिच्या बऱ्याच आठवणी होत्या. ते घर छोटं असलं तरी तिच्यासाठी खास होतं. शिवाय सईचं तिच्या घराशी एक वगेळंच नातं होतं. जुन्या घरामधून खूप आठवणी घेऊन सई तिच्या नव्या जागी राहण्यासाठी गेली आहे.

आणखी वाचा – Video : प्रथमेश लघाटेने स्वयंपाक घरात बसून बनवले उकडीचे मोदक, सुकन्या मोने म्हणाल्या, “तुझ्यासारखा…”

सईने तिच्या नव्या घराचा व्हिडीओ आता युट्युब चॅनलवर प्रदर्शित केला आहे. या व्हिडीओमध्ये सईचं घर पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गगन चुंबी इमारतीमध्ये तिने आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. या फ्लॅटचं इंटेरियर अगदी लक्ष वेधून घेणारं आहे. तसेच लिव्हींग रुममध्ये सईने झाडं ठेवली आहेत. ती म्हणाली, “जुन्या घरामध्ये मी झाडं लावू शकली नाही. कारण मी ज्या इमारतीमध्ये होते तिथे घरामध्ये झाडं लावण्यावर बंदी होती. म्हणून नव्या घरामध्ये मी लिव्हींग रुममध्येच झाडं ठेवली आहेत”.

आणखी वाचा – “तुमच्या आयुष्याच्या तिसऱ्या अंकाचा पडदा पडला”, आजोबांच्या निधनानंतर गौतमी देशपांडेची भावुक पोस्ट, म्हणाली, “स्वतःचे वडील जाण्यापासून…”

डायनिंग टेबलवर बसून कधीच जेवली नसल्याचं सईचं म्हणणं आहे. म्हणून तिने तिच्या घरामध्ये डायनिंग टेबल तयार करुन घेतला. शिवाय तिचं वॉर्डरॉबही अगदी मोठं आहे. मेकअपसाठी विशेष जागा तिने तयार केली आहे. तिच्या घरामधून सुंदर हिरवागार निसर्गही दिसतो. शिवाय संपूर्ण शहराची एक झलक पाहायला मिळते. ती म्हणाली, “१५ वर्ष सतत काम केल्यानंतर निवांत श्वास मी घेतला आहे”. कष्टाने उभारलेल्या घराचा सईला अभिमान आहे.

Tags: entertainment newsmarathi actressmarathi moviesai tamhankar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
prarthana behere honeymoon

४५ दिवस हनिमूनला गेली होती प्रार्थना बेहरे, स्वतःच खुलासा करत म्हणाली, “हनिमूनवरुन आल्यानंतर नवऱ्याला एकच प्रश्न पडला की...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.