मराठी मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या अनेक कलाकारांच्या अनेक समस्या असतात. यापैकी मुख्य आणि मोठी समस्या म्हणजे केलेल्या कामाचे पैसे न् मिळणे. कलाकार ज्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत असतात, कष्ट करत असतात, त्याचेच पैसे न मिळणे ही खरंतर दुर्दैवी गोष्ट आहे. असंच काहीसं झालं आहे एका सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीबरोबर आणि ही अभिनेत्री म्हणजे मीरा जोशी. मीराने ‘कुलस्वामिनी’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली. तर ती ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमातही झळकली होती. त्याचबरोबर तिने काही सीरिजमधूनही प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. (Meera Joshi on production company)
अशातच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे आणि तिच्याबद्दल झालेल्या संपूर्ण प्रकाराबद्दल सांगितलं आहे. गेगेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात केलेल्या एका चित्रपटाच्या शुटींगचे पैसे तिला अद्याप मिळालेले नाहीत. याबद्दल् तिने तक्रारही दाखल केली. पण तिला यात कुणाचीच काहीच मदत न झाल्याचेही तिने सांगितलं आहे. कुणाकडूनच काहीच सहकारी न् मिळल्याने तिला सोशल मीडियावर याबद्दलची माहिती द्यावी लागल्याचेही तिने म्हटलं आहे. मीराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे याबद्दलची माहिती शेअर केली आहे.
याबद्दल तिने असं म्हटलं आहे की, “मी नोव्हेंबर २०२३ मध्ये ‘जिद्दी सनम’ नावाच्या चित्रपटासाठी शूटिंग केले आणि तेव्हापासून माझ्या पेमेंटची वाट पाहत आहे. आता एका वर्षाहून अधिक काळ झाला आहे आणि मी प्रोडक्शनशी बोलत असून CINTAA (Cine & TV Artistes’ Association) मध्ये त्यांच्या विरोधात तक्रार केली आहे. तसंच याबद्दल काही मराठी संघटनांनाही सांगितलं. पण कोणत्याही मराठी संघटनेने मला मदत केली नाही. CINTAA (Cine & TV Artistes’ Association) ने तक्रार नोंदवण्यासाठी माझ्याकडून रक्कमही घेतली, पण माझी समस्या कधीच सोडवली नाही. मी माझे चित्रपटाचे पेमेंट परत मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण त्यांनी पहिल्या शेड्यूलचे शूटिंग सुरू असतानाही मला एक पैसाही मिळाला नाही”.
आणखी वाचा – “जे स्वप्न पाहिलं होतं ते…” रेश्मा शिंदेचा नवऱ्यासाठी हटके उखाणा, लग्नाचा खास व्हिडीओ व्हायरल
यापुढे मीराने म्हटलं की, “मी माझ्या पेमेंटबद्दल काही तपशील इथे शेअर करत आहे. मी त्यांच्यासाठी ०४ आणि ०६ नोव्हेंबर २०२३ रोजी पहिले शेड्यूल शूट केले होते. मला पहिल्या शेड्यूलनंतर लगेच पैसे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. एका आठवड्याच्या आत आणि शेवटची कास्टिंग असल्याने त्यांना पहिल्या शेड्यूल दरम्यान करार करण्यास वेळ नव्हता आणि या कराराच्या अभावामुळे पोलिसदेखील यात मला मदत करु शकत नाहीत. तसंच व्हॉट्सॲप चॅट्स पुरावा म्हणून मानले जात नाहीत. त्यामुळे या प्रकरणात माझा मुद्दा मला इथे (सोशल मीडिया) मांडण्याशिवाय काही पर्याय नाही”. यापुढे मीराने काही ई-मेल, नंबर, चित्रपटाचे तसंच प्रॉडक्शन कंपनीचा उल्लेख केला आहे.
आणखी वाचा – भेट देण्यासाठी, घर सजवण्यासाठीच्या सुंदर वस्तु मिळतील अगदी २०० रुपयांमध्ये, घडयाळ, खुर्च्या आणि बरंच काही
यापुढे तिने म्हटलं की, “मी मेलमध्ये नमूद केल्याप्रमाणे, तुमच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि माझे पेमेंट क्लिअर करण्यासाठी एक वर्षाची वाट पाहिली. माफ करा आमचे. कारण, माझ्यासारखे अनेक कर्मचारी आहेत ज्यांना त्यांचे पेमेंट मिळालेले नाही. आणि हो! ही माझी चूक आहे की, मी विश्वास ठेवला. त्यांची समस्या समजून घेतल्याबद्दल मला पश्चात्ताप झाला की, त्यांनी मला ०३ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा या चित्रपटाबद्दल आणि त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल फोन केला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शूटिंग होते. त्यामुळे त्यांना खरोखर करार करायला वेळ मिळाला नाही.पण ते त्यांच्या पहिल्या शेड्यूलनंतर याबद्दलचा करार करतील असा विश्वास त्यांच्यावर ठेवणे ही माझी मोठी चूक होती”.