समाजात अशा काही स्त्रिया आहेत, ज्या त्यांचे आयुष्य समाजातील काही दुर्लभ घटकांच्या आयुष्यासाठी वेचतात. दुसऱ्यांचे आयुष्य सुलभ करण्यासाठी या स्त्रिया काम करतात. समाजात अशा अनेक स्त्रिया आहेत. यापैकीच एक म्हणजे ‘स्त्री’ म्हणजे स्वाती मुखर्जी. स्वाती मुखर्जी या रस्त्यावरच्या बेघर, अनाथ व बिकट परिस्थितीतील मुलांसाठी स्वत: आई बनल्या. स्वाती मुखर्जी या वात्सल्य संस्थेअंतर्गत काम करतात आणि ही संस्था आशा आशा मुलांसाठी काम करते. जे अनाथ आहेत, ज्यांना स्वत:च राहतं आणि हक्काचं घर नाही. ज्यांची परिस्थिती अगदीच बिकट आहे अशा ग्रासलेल्या परिस्थितीतील मुलांसाठी काम करणाऱ्या स्वाती यांच्याशी ‘मज्जा पिंक’ने संवाद साधला होता. (Swati Mukherjee News)
या सर्व प्रवासाबद्दल स्वाती यांनी असं म्हटलं होतं की, या सामाजिक कार्याची प्रेरणा त्यांना त्यांच्या गुरुकडून मिळाली. तसंच पुढे त्यांनी असं म्हटलं की, ‘वात्सल्य’मध्ये अशी अनेक मुलं शिकत आहेत आणि आमचा उद्देश हा आहे की त्यांनी त्यांच्या खऱ्या आई-वडिलांकडे जावं. हे करताना आम्हाला काही अडचणी येतात, पण आम्हाला त्यांच्याशी अधिक लगाव लागू न देणे हे करावे लागते. ‘वास्तल्य’ सोडून जाताना अनेक मुलांना त्रास होतो, ते रडतातही. पण आम्हाला कठोर व्हावं लागतं. वात्सल्यमधून अनेकजण मुलं शिकून मोठी झाली आहेत आणि मोठ्या हुद्द्यावर आहेत”.
स्वाती यांनी त्यांच्या या समाजिक कार्यासाठी लग्न न केल्याचेही यावेळी सांगितलं. याबद्दल त्या असं म्हणाल्या की, “या कार्यासाठी मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय मी माझ्या संमतीने घेतला आहे. माझे वडील डॉक्टर होते आणि माझ्या आईला झाडे लावण्याची आवड होती”. तर याबद्दल पुढे त्यांनी असं म्हटलं होतं की, “माझ्या पालकांनी मला कधी आग्रह नाही केला. तेव्हा माझ्याकडे दोन पर्याय होते, यापैकी एक म्हणजे मी लग्न करुन घरी बसणे आणि दुसरं म्हणजे या लहान मुलांना सांभाळणे. मग मी दुसरं पर्याय निवडला. हा निर्णय माझ्यासाठी कठीण होता पण मी या निर्णयाने आनंदी आहे”.