शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : मित्रांचा कल्ला, श्रीरामाचं गाणं अन्…; रेश्मा शिंदेने दाखवली लग्नाची संपूर्ण झलक, भावूक होतं म्हणाली, “योग्य निवड केली म्हणूनच…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 21, 2024 | 4:46 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actress Reshma Shinde shared a special video of her wedding on social media

अभिनेत्री रेश्मा शिंदेने दाखवली तिच्या लग्नाची संपूर्ण झलक, खास व्हिडीओ सोशल मीडियावर केला शेअर

मराठी सिनेविश्वात गेल्या काही दिवसांपासून रेश्मा शिंदेच्या लग्नाची जोरदार चर्चा चालू होती. अखेर पवनबरोबर लग्नगाठ बांधत अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. २९ नोव्हेंबर रोजी रेश्माचा विवाहसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमने साजऱ्या केलेल्या केळवणाचे फोटो शेअर करत सर्व चाहत्यांना सुखद दिला होता. यानंतर अभिनेत्रीचं दुसरं केळवण तिच्या लाडक्या मैत्रिणी अनुजा साठे आणि अभिज्ञा भावे यांनी केलं होतं. हळद, मेहंदी असे लग्नाआधीचे विधी पार पडल्यावर रेश्माने लग्नगाठ बांधत आयुष्यातील एका नवीन प्रवासाला सुरुवात केली. (Reshma Shinde Wedding Video)

श्रीरंग देशमुख, मृणाल देशपांडे, अभिजीत खांडकेकर, पौर्णिमा तळवलकर, हर्षदा खानविलकर, विदिषा म्हसकर, शाल्मली, अनघा अतुल, आशुतोष गोखले आदी कलाकार रेश्माच्या लग्नाला हजर होते. त्याचबरोबर ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील काही कलाकारांनीदेखील रेश्माच्या लग्नाला खास उपस्थिती लावली होती. मित्रमंडळींच्या आणि जवळच्या काही नातेवाईकांच्या खास उपस्थितीत रेश्मा शिंदे विवाहबंधनात अडकली. अशातच आता या संपूर्ण विवाहसोहळ्याची झलक अभिनेत्रीने शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Reshma Shinde (@reshmashinde02)

आणखी वाचा – अश्विनी काळसेकर कधीच आई का होऊ शकल्या नाहीत?, पहिल्यांदाच सांगितली संपूर्ण घटना, म्हणाल्या, “किडनीचा त्रास, वाईट वाटतं आणि…”

रेश्माने तिच्या सोशल मीडियावर लग्नाचा खास व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओच्या सुरुवातीलाच ती नवऱ्यासमोर काहीशी भावुकही झाल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये ती सुरुवातीलाच असं म्हणते की, “लग्नाच्या दिवशी मी आईला रडताना बघत होते. माझं मन दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करत होते. म्हटलं आज नाही रडायचं. कारण हा माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा आणि मोठा दिवस आहे. मला माहीत आहे, मी एक योग्य निवड केली आहे. म्हणूनच मला रडायचं नव्हतं”.   

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीने बाथटबमध्ये गमावला, जागीच गुदमरुन मृत्यू, परफॉर्मन्स करण्यास जाणार होती पण…

तसंच पुढे या व्हिडीओमध्ये रेश्मा व पवन यांच्या लग्नाच्या ठिकाणचे खास फोटो पाहायला मिळत आहे. लग्नात त्यांच्या मित्रपरिवाराने केलेली धमाल, मजामस्तीही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. तसंच रेश्माच्या एन्ट्रीचे, वधूवरावर पडत असलेल्या अक्षतांचे आणि एकमेकांना वरमाला घालतानाचे काही खास क्षणही या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. लग्न लागताच रेश्माने श्रीरामाचे गाणं लावलं होतं आणि ही तिची फर्माईशच होती. लग्न लागताच तिला नवऱ्याने उचलूनही घेतलं होतं. एकूणच तिच्या लग्नाचा हा खास व्हिडीओ चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे   

Tags: reshma shindereshma shinde marriageReshma Shinde Wedding Video
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bollywood director Subhash Ghai admitted to Hospital in Mumbai due to health reasons see the details

मोठी बातमी! प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई लीलावती रुग्णालयात दाखल, आयसीयूमध्ये उपचार सुरु, आता कशी आहे प्रकृती?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.