जपानी मनोरंजन क्षेत्रातून एक दुखद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री व गायिका मिहो नाकायामाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून टोकियो येथील घरी मृतावस्थेत सापडली आहे. मृत्यूसमयी त्या ५४ वर्षाच्या होत्या. नाकायमा यांना शुक्रवारी एका इव्हेंटला पोहोचायचे होते. मात्र त्या जाऊ शकल्या नाहीत. मात्र त्या घारातील बाथटबमध्ये मृतावस्थेत सापडल्या. त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीने याबद्दल माहिती देत घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितले. मात्र त्यांच्या मृत्यूचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. त्यांच्या मृत्यूने त्यांच्या चाहत्यांना मोठं धक्का बसला असून मनोरंजन क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्याबद्दल आपण सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. (miho nakayama death)
नाकायामा यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच त्याबद्दल तपास सुरु आहे. शुक्रवारी ओसाका येथे एका ख्रिसमस पार्टीमध्ये त्या परफॉर्म करणार होत्या. मात्र तब्येत ठीक नसल्याने त्यांनी हा कार्यक्रम रद्द केला होता. त्यांच्या टीमने निधनाची अधिकृत माहिती वेबसाईटच्या माध्यामातून दिली आहे. तसेच त्यांच्या अचानक मृत्यूमुळे सगळ्यांना धक्का बसला असून दु:ख देखील व्यक्त केले आहे.
त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, “आम्हा सर्वांना ज्यांनी त्यांची काळजी घेतली आणि त्या सर्व चाहत्यांना ज्यांनी नेहमी त्यांना सपोर्ट केला. अचानक ही घोषणा करताना खूप दु:ख होत आहे. पण ही घटना इतकी अचानक घडली की आम्ही स्वतः खूप हैराण झालो असून दु:खी आहोत. आता त्यांच्या मृत्यूचा तपास सुरु आहे. लवकरच त्यांच्या मृत्यूचे कारण समोर येईल”.
नाकायामा या १९८०-९० च्या दशकात अधिक प्रकाशझोतात आल्या. १९९५ साली त्यांचा ‘लव्ह लेटर’ हा चित्रपट अधिक प्रसिद्ध झाला. तसेच ‘टोक्यो वेदर’ या चित्रपटामध्येदेखील दिसून आल्या होत्या. संपूर्ण कारकिर्दीत नाकायामा जपानमधील सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक बनल्या. चित्रपट टेलिव्हिजन, व संगीतक्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली. 'लव्ह लेटर' मधील त्यांच्या अभिनयाने त्यांना ब्लू रिबन अवॉर्ड्स आणि होची फिल्म अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पुरस्कार मिळाले. तसेच या चित्रपटाने टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही पुरस्कार जिंकले. नाकायामा यांच्या पश्चात त्यांचा मुलगा आहे.