टेलिव्हीजन अभिनेत्री अश्विनी काळसेकर सध्या खूप चर्चेत आल्या आहेत. हिंदी मालिकांमध्येदेखील तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘कसम से’ या मालिकेमध्ये तिने ‘जिज्ञासा’ ही भूमिका साकारली होतो. २००९ साली त्यांनी अभिनेते मुरली शर्मा यांच्याशी लग्न केले. त्याच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिल्या आहेत. नुकतीच त्यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगाबद्दल दिलखुलासपणे भाष्य केले आहे. आजवर कोण-कोणत्या प्रसंगांना सामोरे जावे लागले याबद्दलही त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. अश्विनी यांना मूल नाही. त्याबद्दल त्यांनी भाष्य केले आहे. मूल जन्माला घालणं हा एक मोठा निर्णय असतो. याचा परिणाम संपूर्ण आयुष्यावर पडतो असे त्यांनी सांगितले आहे. (ashwini kalsekar on children)
अश्विनी सध्या ५४ वर्षांच्या आहेत. मात्र त्यांनी आई होण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना खूप समस्यांचा सामना करावा लागला. याबद्दल त्यांनी एका मुलाखतीमध्ये याबद्दल सांगितले आहे. आश्विनी यांनी ‘हॉटरफ्लाय’ च्या ‘द मेल फेमिनिस्ट’ला मुलाखत दिली. यावेळी सिद्धार्थ आलमबायनने अश्विनी यांना विचारले की, “तुम्ही व मुरली यांनी मूल जन्माला घालण्याचा कधी विचार केला का?”, त्यावर अश्विनी यांनी सांगितले की, “खरं सांगायचं तर आम्ही प्रयत्न केला होता. पण मला किडनी संदर्भात समस्या होत्या. तसेच त्यावेळी सरोगसी हा प्रकार अधिक प्रचलित नव्हता”.
पुढे त्या म्हणाल्या की, “आम्ही खूप प्रयत्न केले पण डॉक्टर म्हणाले की तुमची किडनी पचवू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला किंवा मुलाला त्रास शकतो. मला मूल नाही होऊ शकले. पण हा नाशिबाचा एक भाग आहे. वाईट वाटत. मला सगळं हवं होतं आयुष्यात पण नाही होऊ शकलं. कदाचित सासू-सासरे, आई- वडिलांची सेवा करणं बाकी होतं. ती मी आता करत आहे”.
नंतर त्या म्हणाल्या की, “माझी मुलं नसली तरीही माझ्याकडे दोन श्वान आहेत. त्यांना सांभाळण्यासाठी एक नॅनीदेखील ठेवली आहे. त्यांना मी माझ्या मुलांप्रमाणे सांभाळत आहे”. दरम्यान सध्या अश्विनी यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्या ‘सिंघम २’ या चित्रपटांमध्ये दिसून आल्या होत्या.