बॉलीवूड विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष घई यांना तब्येतीच्या कारणास्तव मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुभाष घई यांना बुधवारी श्वसनाचा त्रास, अशक्तपणा आणि वारंवार चक्कर येत असल्याने रुग्णालयात दाखल केले. ते सध्या आयसीयूमध्ये आहेत. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष घई सध्या न्यूरोलॉजिस्ट डॉ. विजय चौधरी, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नितीन गोखले आणि पल्मोनोलॉजिस्ट डॉ. जलील पारकर यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमच्या जवळच्या देखरेखीखाली आहेत. (Subhash Ghai Admitted Hospital)
मेंदू, छाती आणि ओटीपोटीच्या संदर्भातील काही तपासण्या तसंच आवश्यक रक्त तपासण्या करण्यात आले आहेत. मानेच्या अल्ट्रासाऊंडने हायपोइकोइक मार्जिनसह थायरॉइटाइटिसचं निदान केलं आहे. तसंच सोमवारी त्यांचे पेट सीटी स्कॅन (PET-CT scan) करण्यात येणार असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे. सुभाष घई यांना हृदयविकाराचा त्रास असल्याने २०११ मध्ये पेसमेकर बसविण्यात आलं होतं. तसंच नुकत्याच करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये त्यांना हायपोथारॉईडीझमचंही निदान झालं होतं.
सुभाष घई यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची चिन्हे दिसत असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले. सुभाष घई यांना एका दिवसात आयसीयूमधून सामान्य वॉर्डमध्ये हलवले जाण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर ‘एबीपी न्यूज’शी बोलताना, सुभाष घई यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, त्यांची तब्येत आता पूर्णपणे ठीक आहे. त्यांना त्यांच्या नियमित तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे.
आणखी वाचा – 08 December Horoscope : आज मिथुन व मीन राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ, तुमच्यासाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या…
दरम्यान, त्यांच्या कामानदडल बोलायचे झाले तर आजवर त्यांनी अनेक यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शन व निर्मिती केली आहे. सुभाष घई यांनी ‘कालीचरण’, ‘कर्ज’, ‘हिरो’, ‘विधाता’, ‘मेरी जंग’, ‘कर्म’, ‘राम लखन’, ‘सौदागर’, ‘खलनायक’, ‘परदेस’, ‘परदेस’ असे अनेक चित्रपट केले आहेत. ताल’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. 2014 मध्ये त्यांनी शेवटचा ‘कांची’ चित्रपट दिग्दर्शित केला होता.