मराठी सिनेविश्वात गेल्या काही दिवसांपासून रेश्मा शिंदेच्या लग्नाची जोरदार चर्चा चालू होती. अखेर पवनबरोबर लग्नगाठ बांधत अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. २९ नोव्हेंबर रोजी रेश्माचा विवाहसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमने साजऱ्या केलेल्या केळवणाचे फोटो शेअर करत सर्व चाहत्यांना सुखद दिला होता. यानंतर अभिनेत्रीचं दुसरं केळवण तिच्या लाडक्या मैत्रिणी अनुजा साठे आणि अभिज्ञा भावे यांनी केलं होतं. हळद, मेहंदी असे लग्नाआधीचे विधी पार पडल्यावर रेश्माने लग्नगाठ बांधत आयुष्यातील एका नवीन प्रवासाला सुरुवात केली. (Reshma Shinde Wedding Video)
श्रीरंग देशमुख, मृणाल देशपांडे, अभिजीत खांडकेकर, पौर्णिमा तळवलकर, हर्षदा खानविलकर, विदिषा म्हसकर, शाल्मली, अनघा अतुल, आशुतोष गोखले आदी कलाकार रेश्माच्या लग्नाला हजर होते. त्याचबरोबर ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील काही कलाकारांनीदेखील रेश्माच्या लग्नाला खास उपस्थिती लावली होती. मित्रमंडळींच्या आणि जवळच्या काही नातेवाईकांच्या खास उपस्थितीत रेश्मा शिंदे विवाहबंधनात अडकली. अशातच आता या संपूर्ण विवाहसोहळ्याची झलक अभिनेत्रीने शेअर केली आहे.
रेश्माने तिच्या सोशल मीडियावर लग्नाचा खास व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओच्या सुरुवातीलाच ती नवऱ्यासमोर काहीशी भावुकही झाल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये ती सुरुवातीलाच असं म्हणते की, “लग्नाच्या दिवशी मी आईला रडताना बघत होते. माझं मन दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करत होते. म्हटलं आज नाही रडायचं. कारण हा माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा आणि मोठा दिवस आहे. मला माहीत आहे, मी एक योग्य निवड केली आहे. म्हणूनच मला रडायचं नव्हतं”.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीने बाथटबमध्ये गमावला, जागीच गुदमरुन मृत्यू, परफॉर्मन्स करण्यास जाणार होती पण…
तसंच पुढे या व्हिडीओमध्ये रेश्मा व पवन यांच्या लग्नाच्या ठिकाणचे खास फोटो पाहायला मिळत आहे. लग्नात त्यांच्या मित्रपरिवाराने केलेली धमाल, मजामस्तीही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. तसंच रेश्माच्या एन्ट्रीचे, वधूवरावर पडत असलेल्या अक्षतांचे आणि एकमेकांना वरमाला घालतानाचे काही खास क्षणही या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. लग्न लागताच रेश्माने श्रीरामाचे गाणं लावलं होतं आणि ही तिची फर्माईशच होती. लग्न लागताच तिला नवऱ्याने उचलूनही घेतलं होतं. एकूणच तिच्या लग्नाचा हा खास व्हिडीओ चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे