शुक्रवार, मे 23, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“प्रेम, कठीण काळ…”, पतीच्या वाढदिवसानिमित्त क्रांती रेडकरची खास पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “मी त्याच्याशी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 14, 2023 | 10:38 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kranti Redkar Husband Birthday

"प्रेम, कठीण काळ…", पतीच्या वाढदिवसानिमित्त क्रांती रेडकरची खास पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "मी त्याच्याशी…"

अभिनेत्री क्रांती रेडकरने तिच्या अभिनयशैलीने व नृत्यशैलीने आजवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. क्रांती नेहमीच तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावरील अभिनेत्रीचा वावर हा बऱ्यापैकी मोठा असलेला पाहायला मिळतो. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये क्रांतीचं नाव अव्वल स्थानावर आहे. क्रांती तिच्या जुळ्या मुलींच्या व्हिडीओमुळे विशेष चर्चेत असते. नेहमीच ती तिच्या लेकींचे मज्जेदार किस्से चाहत्यांसह शेअर करते. (Kranti Redkar Husband Birthday)

अभिनेत्री क्रांती रेडकर जितकी चर्चेत असते तितकेच तिचे पती सरकारी अधिकारी समीर वानखडे देखील त्यांच्या बिनधास्त व बेधडधक कामामुळे नेहमीच चर्चेत असतात. कलाक्षेत्राशी समीर यांचा अधूनमधून संबंध येत असतो. समीर वानखेडे यांच्यावर वेगवेगळे आरोप होत असताना क्रांती भक्कमपणे आपल्या नवऱ्याला साथ देताना दिसते. क्रांती तिच्या पतीच्या कायम पाठीशी खंबीरपणे उभी असलेली दिसते. सोशल मीडियावरुन नेहमीच ती पतीच्या कौतुकास्पद पोस्टही शेअर करताना दिसते.

आणखी वाचा – “शेवटच्या क्षणीही…” दीराचे निधन झाल्यानंतर प्रिया बेर्डेंची भावुक पोस्ट, म्हणाल्या, “बेर्डे कुटुंब गोव्याला गेलो होतो आणि…”

अशातच क्रांतीच्या सोशल मीडियावरून तिने तिच्या पतीसाठी केलेली खास पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. अभिनेत्रीने तिच्या पतीच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडीओ शेअर करत ही पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये कॅप्शन देत, “होय मी त्याच्याशी लग्न केले आहे. तुमचे काम तुम्हाला मोठं करत. समीर तू आपल्या भारत मातेची सेवा करत राहा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रेम, कठीण काळ येतात व जातात यातून आपण किती सुंदरपणे प्रवास करतो हे महत्त्वाचे आहे. असा परिपूर्ण असा शौर्यवीर मी कधीही पाहिला नाही जो केवळ सत्यासाठी उभा राहत नाही तर प्रत्येक परिस्थितीत लढतो” असं म्हणत तिने नवऱ्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

आणखी वाचा – ‘आई कुठे…’चा सेट उभा करण्यासाठी इतकी करावी लागते मेहनत, रुपाली भोसलेने दाखवला Inside Video, म्हणाली, “मालिकेच्या सेटचे घर…”

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर समीर व क्रांती यांनी अत्यंत साधेपणाने लग्नगाठ बांधली. क्रांती समीरच्या प्रामाणिकपणाच्या प्रेमात असल्याचंही तिने बऱ्याच मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. क्रांतीने २०१८ मध्ये झिया व झिदा या दोन जुळ्या मुलींना जन्म दिला.

Tags: entertainmentkranti redkarKranti Redkar Husband Birthdaymarathi actressSameer Wankhede
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Salman Khan
Entertainment

घरापर्यंत पोहोचली, दरवाजाची बेलही वाजवली अन्…; ‘त्या’ महिलेचा सलमान खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न, घडलं असं की…

मे 23, 2025 | 3:46 pm
dowry death in pune
Social

बापाला शेवटचा फोन अन् लेकीने संपवलं आयुष्य, पुण्यात हुंड्यामुळे आणखी एक बळी, लग्नाच्या एका महिन्यातच…

मे 23, 2025 | 3:35 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

“हुंड्याच्या पैशांतून उभारलेली घरंदारं…”, वैष्णवी हगवणे प्रकरणी मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत, म्हणाले, “असा छळ…”

मे 23, 2025 | 12:51 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

“प्रकरण दाबलं तर पुन्हा पैसा व पद…”, वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं बेधडक वक्तव्य, म्हणाली, “आरोपींना…”

मे 23, 2025 | 12:35 pm
Next Post
marathi actress hemangi kavi shared emotional post with memory of dhudgus movie after veteran marathi actor ravindra berde death

"त्यांना असं रडताना पाहून…", रवींद्र बेर्डेंच्या निधनानंतर हेमांगी कवी भावुक, म्हणाली, "जो नट इतकी वर्षे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.