शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“पोस्ट करणं बंद करा”, बदलापूर व कोलकाता बलात्कार प्रकरणी प्रिया बापटची पोस्ट, म्हणाली, “आता कदाचित…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 27, 2024 | 11:59 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi actress Priya Bapat shared a reminder post about the Badlapur Sexual Assault and Kolkata Doctor Case

बदलापूर व कोलकाता बलात्कार प्रकरणी प्रिया बापटने शेअर केली आठवण करुन देणारी पोस्ट, म्हणाली, “पोस्ट करणे बंद केले असेल परंतू...”

Priya Bapat Post : पुरोगामी विचारांचा मानला जाणारा महाराष्ट्र हा गेल्या काही दिवसांतील महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराने पुरता हादरून गेला आहे. कोलकाता डॉक्टर बलात्कार प्रकरण, त्यानंतर बदलापूर येथे दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटताना दिसले. त्यानंतर तर महिलांवरील रोजच्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असल्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न आता आणखीनच गंभीर झाला आहे. कोलकाता नंतर बदलापूर घटनेवर सर्वच स्तरातून रोष व्यक्त केला गेला. मनोरंजन, राजकीय तसंच क्रीडा व उद्योग क्षेत्रातून या घटनेवर प्रतिक्रिया उमटल्या होत्या. (Priya Bapat on Badlapur and Kolkata Rape Case)

२० ऑगस्ट रोजी बदलापूरकरांनी तब्बल ११ तास रेल रोको करत सरकारला धारेवर धरलं. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या प्रकरणाबद्दल अनेकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. यामध्ये बॉलिवूडसह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. आपल्या सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करत या कलाकारांनी पीडित चिमूकल्यांना न्याय व आरोपीला शिक्षा देण्याची मागणी केली होती. या घटनेला आता जवळपास एक आठवडा झाला असून या प्रकरणी काही ठोस पावले उचलली गेली नसून ही घटना आता सर्व विसरून गेलेत की काय असा प्रश्न प्रिया बापटने व्यक्त केला असून तिने यासंबंधित एक पोस्टही शेअर केली आहे.      

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : अरबाजने रागाच्या भरात घरातल्या वस्तू फोडल्या, जोरजोरात ओरडला अन्…; निक्की-अभिजीतची जवळीक सहन पाहवेना

प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे असं म्हटलं आहे की, “आपण आता कदाचित त्याबद्दल पोस्ट करणे बंद केले असेल. परंतू, हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. न्याय मिळाला नाही. अजूनही सुरक्षितता कमी आहे आणि खरी समानता हे अजूनही खूप लांबचे ध्येय आहे”. प्रियाने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तिने घटनांचा उल्लेख केलेला नसला तरी प्रियाचा रोख हा नुकत्याच झालेल्या कोलकाता व बदलापूर घटनेकडे असल्याचे दिसून येत आहे. प्रियाने तिच्या या पोस्टद्वारे या घटनांबद्दल पुन्हा एकदा आठवण करुन दिली असून न्याय व सुरक्षिततेची मागणी  केली आहे.

आणखी वाचा – नवरा असावा तर असा! मंगळागौरीच्या दिवशी प्रसादने झाडू मारत केली साफसफाई , अमृता कौतुक करत म्हणाली, “लोक त्याच्याबद्दल वाईट…”

दरम्यान, बदलापूर व कोलकाता प्रकरणी मराठीतील अनेक कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. प्रसाद ओक, मृण्मयी देशपांडे, सिद्धार्थ चांदेकर, अभिजीत केळकर, शिवाली परब, रितेश व जिनीलिया देशमुख, कुशल बद्रिके, सुरेखा कुडची, सोनाली कुलकर्णी, यांसारख्या अनेक कलाकारांनी या घटनेवर संताप व्यक्त केला होता. अशातच आता प्रियाने पुन्हा या घटनेबद्दल आठवण करून दिली आहे

Tags: Badlapur Sexual AssaultKolkata Doctor Rapepriya bapatPriya Bapat on Badlapur Sexual Assault and Kolkata Doctor Rape
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 nikki and vaibhav fight

Bigg Boss Marathi : “मीच घरची महाराणी, वैभवची लायकी…”, निक्कीचं भान हरपलं, वैभव अंगावर धावून गेला तर जान्हवीने…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.