Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात भाऊचा धक्का झाल्यापासून स्पर्धकांमध्ये वेगळं वागणं सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर अगदी पहिल्या दिवसापासून वाद घालताना दिसत आहेत. अरबाजच्या हातून कॅप्टन्सी गेल्यानंतर ‘बिग बॉस’च्या या आठवड्याची कॅप्टन्सी निक्की तांबोळीकडे येते. निक्कीकडे कॅप्टन्सी आल्यानंतर तिचं वागणं बदलत याबाबत तिच्या टीममधील स्पर्धक मंडळी चर्चा करतात. याचा खुलासा ‘बिग बॉस’च्या चक्रव्ह्यूहमध्ये झाला. त्यावेळी निक्कीचे डोळे उघडले. अरबाज, जान्हवी यांनी निक्कीच्या मागे केलेली चर्चा पाहून निक्कीला खूप मोठा धक्का बसला.
निक्कीने आता टीम ए मधून एक्झिट घेतली असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे निक्की व टीम ए मधील स्पर्धकांमध्ये वाद सुरु झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. निक्की व जान्हवी यांची मैत्रीही संपते. त्यानंतर आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये निक्कीबरोबर वैभव व जान्हवी यांचा वाद होताना पाहायला मिळत आहे. हा वाद इतका झाला आहे की वैभव निक्कीच्या अंगावर धावून गेलेला प्रोमोमध्ये दिसत आहे. सध्या हा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
आणखी वाचा – “पोस्ट करणं बंद करा”, बदलापूर व कोलकाता बलात्कार प्रकरणी प्रिया बापटची पोस्ट, म्हणाली, “आता कदाचित…”
निक्की असं बोलताना दिसत आहे की, “मी घराची महाराणी आहे”. यावर जान्हवी जेलमधून ओरडत म्हणते, “तू नोकर व्हायच्याही क्षमतेची नाही आहेस”. यावर जान्हवी ओरडत म्हणते, “वैभवची कॅप्टन बनायची औकात आहे का?”. त्यावर, वैभव पुढे येत म्हणतो, “ए नासके बास कर”. यावर निक्की तिकडून पुढे येत, “बच्चू आहे”, असं म्हणते. यावर वैभव रागात बोलतो, “थोबाड दिलं म्हणून काहीपण बोलू नकोस. नाही तुझी मस्ती जिरवली तर बघ”. यावर निक्की वैभवला “गप्प भुसनळ्या”, असं म्हणते. यावर वैभव निक्कीच्या अंगावर धावून जातो तेव्हा डीपी त्याचा हात धरतो.
जान्हवी व निक्कीच्या वादात आता उडी मारली आहे. निक्कीने वैभवची कळ काढत त्याला डिवचलेलं पाहायला मिळत आहे. यामुळे आता वैभव व जान्हवी मिळून निक्की विरोधात कोणता नवा प्लॅन आखणार, निक्कीला ते अद्दल शिकवणार का हे पाहणं रंजक ठरेल.