Amruta Deshmukh : मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री अमृता देशमुख व अभिनेता प्रसाद जवादे. ‘बिग बॉस मराठी’मुळे ही जोडी चर्चेत आली होती. दोघेही ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वात एकत्र सहभागी झाले होते. या शोमध्ये दोघांची घट्ट मैत्री झाली होती. नंतर शो संपल्यावर काही महिन्यांमध्ये अमृता व प्रसाद एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या आणि अखेर २०२३ च्या जुलै महिन्यात दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकत सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आणि नोव्हेंबर २०२३ मध्ये त्यांनी थाटामाटात लग्नही केलं. प्रसाद-अमृताचा लग्नसोहळा १८ नोव्हेंबरला थाटामाटात पार पडला. (Amruta Deshmukh praised husband Prasad Jawade)
अशातच काही दिवसांपूर्वी अमृता लग्नानंतर तिची पहिली मंगळागौर साजरी केली. यानिमित्ताने प्रसाददेखील त्याच्या मालिकेच्या शूटिंगमधून वेळ काढून बायकोच्या पहिल्या मंगळागौरीला उपस्थित राहिला होता. त्यांनी मंगळागौर साजरी केल्याचे काही खास फोटो व व्हिडीओही शेअर केले होते आणि त्यांच्या या फोटो व व्हिडीओला प्रेक्षकांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. प्रसाद व अमृता दोघेही नेहमीच आपल्या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसून येते. तर ही जोडी कमालीचे रील्सदेखील बनवत असते. तसंच दोघे एकमेकांच्या कामानिमित्त काही पोस्टही शेअर करत असतात. अशातच अमृताने तिच्या नवऱ्याची खास पोस्ट शेअर केली आहे.

अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये प्रसादने झाडू मारत घरात साफसफाई करत आसल्याचे दिसत आहे आणि याचमुळे अमृताने त्याचे कौतुक केलं आहे. या पोस्टमध्ये अमृताने प्रसादच्या झाडू मारतानाच्या फोटोसह असं म्हटलं आहे की, “प्रसाद जवादे हा प्रसाद जवादेच आहे. तो कुठे आहे?, त्याने काय घातले आहे? आणि त्याला कोण पाहत आहे? यामुळे त्याला काहीच फरक पडत नाही. म्हणूनच मला हा माणूस खूप आवडतो आणि हो तो झाडू मारतो म्हणूनही नाही. कधी कधी लोक त्याच्याबद्दल वाईट बोलून थकत नाहीत”.
आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’मधील सायलीवर शस्त्रक्रिया, शूटला सुरुवात करताच म्हणाली, “शूट थांबलं नाही पण…”
यापुढे अमृताने नवऱ्याचे कौतुक करत असं म्हटलं आहे की, “प्रसाद या ग्रहावरील सर्वात नम्र आणि दयाळू माणूस आहे आणि तो फक्त फायरचं नाही तर फ्लॉअरही आहे”. दरम्यान, दोघांनी मंगळागौरीसाठी खास लूक केला होता. यावेळी अमृताने जांभळ्या रंगाच्या नऊवारी साडी, त्यावर वेस्टर्न डिझाइन असलेले दागिने, नाकात नथ असा खास लूक केला होता. तर प्रसादने देखील बायकोच्या पहिल्या मंगळागौरीसाठी ऑफ व्हाइट रंगाचा कुर्ता घातला होता.