मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे. प्रार्थनाने २००९मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ती हिंदी मालिकेतही झळकली होती. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. त्यानंतर ‘मितवा’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये तिने उत्कृष्ट काम करत आपली वेगळी ओळख निर्माण केली. प्रार्थना नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. तिच्याबाबत असलेल्या अफवाही बऱ्याचदा ऐकायला मिळतात. त्यातील एका विषयावर तिने भाष्य केलं आहे. (Prarthana behere share about her married life)
प्रार्थानाने नुकतंच स्वतःचं युट्युब चॅनेल सुरु केलं आहे. यामार्फत ती प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. यापूर्वीही तिने व्हिडिओतून तिच्या अलिबागच्या घराची झलक दाखवली होती. या व्हिडिओतही तिने अलिबागच्या घराबाहेरचा आवार दाखवला आहे. त्याचबरोबर ती आपल्या आयुष्यातील बऱ्याच गुपितांचा उलघडाही करताना दिसते. अशाच एका चर्चेबाबत तिला विचारलं असता तिना उत्तर दिलं.
“तुमच्याबदद्लचं असं कोणतं चर्चा आहे की जी तुला ऐकल्यावर हसायला येतं?” या प्रश्नाचं उत्तर देताना प्रार्थना सुरुवातीला हसली आणि पुढे म्हणाली, “मध्यंतरी कोणीतरी मला असं सांगितलं होतं की माझा नवरा मला मारतो. हे ऐकून मी व अभि खूप हसलो होतो. मी अभिला सांगितलं लोकांना असं वाटतं की तु मोठा धिप्पाड दिसतोस. तुझं व्यक्तिमत्त्व तसंच आहे म्हणून त्यांना असं वाटतं की तु मला मारत असावा. मी तुला घाबरत असेन. पण मला हे खूप मजेशीर वाटतं. प्रार्थना बेहेरे कोणाच्या हातचा मार खाईल असं तुम्हाला वाटतं का?”, असं सांगत त्या चर्चा खोट्या असल्यावर शिक्का मोर्तब केलं आहे.
आणखी वाचा – लवकरच विवाहबंधनात अडकणार जुई गडकरी, लग्नाबाबत प्रश्न विचारताच म्हणाली, “पत्रिका…”
तिने शेअर केलेला व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. तिच्या युट्युब चॅनलला चाहते चांगलाच प्रतिसाद देत आहेत असं दिसून येत आहे.