रविवार, जून 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लवकरच विवाहबंधनात अडकणार जुई गडकरी, लग्नाबाबत प्रश्न विचारताच म्हणाली, “पत्रिका…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 13, 2023 | 4:29 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
jui gadkari share update about her wedding

jui gadkari share update about her wedding

सध्या ‘स्टार प्रवाह’वरील ‘ठरलं तर मग’ मालिकेला चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. अभिनेत्री जुई गडकरी व अभिनेता अमित भानुशाली यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही मालिका टीआरपीच्या यादीत अव्वल स्थानावर कायम टिकून आहे. याच आठवड्यात या मालिकेने रेकॉर्डब्रेक टीआरपी मिळवली आहे. नुकतंच मालिकेच्या सेटवर यानिमित्त सेलिब्रेशन चांगल्या जल्लोषात साजरा करण्यात आलं. याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (fame jui gadkari share update about her wedding)

मालिकेतील ‘सायली’ हे पात्र साकारणारी जुई प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. त्यामुळे सायली म्हणजेच जूईचा मोठा चाहतावर्ग आहे. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. नेहमी ती कामाव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.  ती ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवरील धमाल-मस्ती व त्यादरम्यानचे व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे शेअर करताना दिसते. मागेही तिने निवांत वेळी करत असलेल्या महत्त्वाच्या कामाचा व्हिडिओ शेअर केला होता. तसेच तिला चित्रीकरणामधून वेळ मिळाला की, विविध व्हिडीओ शेअर करताना दिसते.

View this post on Instagram

A post shared by Jui Gadkari (@juigadkariofficial)

आणखी वाचा – “नाभीक्षेत्र झाकावे अन्यथा विद्यार्थ्यांच्या भावना…”, गौरव मोरेच्या तोंडी बोल्ड संवाद, ‘बॉईज ४’चा नवा टीझर पाहून प्रेक्षकांनाही हसू अनावर

आताही तिने चाहत्यांबरोबर संवाद साधण्यासाठी इन्स्टाग्रामवर एक सेशन ठेवलं होतं. या सेशनद्वारे तिने चाहत्यांना तिला प्रश्न विचारण्याची संधी दिली होती. यावेळी एका चाहत्याने जुईला तिच्या खासगी आयुष्याबाबत प्रश्न विचारला. जुईने त्याच्या या प्रश्नाला अगदी हसत खेळत उत्तर दिलं. “तुझं लग्न कधी होणार आहे?” असा प्रश्न एका चाहत्याने जुईला विचारला. या प्रश्नाला ती उत्तर देत म्हणाली, “लवकरच माझं लग्न आहे. पत्रिका छापल्या की, तुम्हाला नक्की आमंत्रण देणार”. असं लिहीत तिने चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर दिलं.

View this post on Instagram

A post shared by Jui Gadkari (@juigadkariofficial)

आणखी वाचा – “तिच्यामुळे मी लग्न करु शकत नाही”, तनुश्री दत्ताची राखी सावंत विरोधात पोलिसांत तक्रार, नाना पाटेकरांचाही केला उल्लेख, म्हणाली, “तिने मला…”

दरम्यान या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत आपला अव्वल क्रमांक टिकवून ठेवला आहे. मालिकेतील सायलीवर झालेला हल्ला टीआरपीच्या शर्यतीतील महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. यापूर्वी टीआरपीचा आकडा ७च्या पार जात नव्हता मात्र मालिकेतील येत असलेल्या विविध वळणांमुळे मालिकेचा टीआरपी ७.४ वर पोहोचला आहे.  

Tags: jui gadkarimarathi serialTharla Tar Mag
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Does Coffee Cause Dehydration
Entertainment

कॉफी प्यायल्याने Dehydration कमी होते का?, मोठा गैरसमज होणार दूर, वाचा सविस्तर

जून 4, 2026 | 12:00 pm
Next Post
Shivali Parab share a Video

“झाडू मारली, कलाकारांचे कपडे इस्त्री केले अन्…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा खुलासा, म्हणाली, “लोकांच्या लग्नात…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.