गुरूवार, मे 15, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“नवऱ्याला ओढून…”, प्रविण तरडेंच्या शॉपिंगला कंटाळली बायको, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “वाट बघत बसली आणि…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 14, 2023 | 11:28 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Snehal Tarde post a Video

"नवऱ्याला ओढून…", प्रविण तरडेंच्या शॉपिंगला कंटाळली बायको

अभिनेता व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या नावांमध्ये गणलं जातं. अत्यंत खडतर परिस्थितीतून आलेले प्रवीण यांनी अभिनेता म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर ते कधीच मागे हटले नाही. अभिनयाबरोबरच ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी लेखन व दिग्दर्शनाची भूमिका उत्तमरीत्या पार पाडली आहे. प्रवीण यांची पत्नी स्नेहल तरडे हीदेखील प्रसिद्ध अभिनेत्री असून तिनेही अनेक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. (Snehal Tarde post a Video)

स्नेहल तरडे सोशल मीडियावर सक्रिय असून ती अनेक व्हिडिओज तिच्या चाहत्यांसह शेअर करते. असाच एक व्हिडिओ नुकताच पोस्ट केला आहे, जो सध्या व्हायरल होत आहे. प्रवीण तरडे यांना शॉपिंगचे प्रचंड वेड आहे. ते जेव्हा जिथे शॉपिंगसाठी जातात, तेव्हा तिथे अनेक वस्तूंची खरेदी करताना दिसतात. पतीच्या शॉपिंगला ती कंटाळली असून तिला अनेकदा प्रवीण यांना त्या शॉपिंग सेंटरमधून ओढून बाहेर काढावं लागतं. स्नेहलने नुकताच यावर एक गमतीशीर व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती आपल्या पतीच्या शॉपिंगबद्दल बोलताना दिसत आहेत.

हे देखील वाचा – “प्रार्थना बेहरेचा नवरा तिला मारतो”, सततच्या होणाऱ्या चर्चांबाबत अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली, “मी त्याला घाबरते असं…”

पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये ती म्हणाली की, “आम्ही जगातल्या त्या काही दुर्मिळ जोडप्यांपैकी एक आहोत, जिच्या नवऱ्याला प्रचंड शॉपिंगचं वेड आहे. मात्र बायको त्या शॉपिंग सेंटरच्या बाहेर नवऱ्याची वाट बघत बसली आहे. मला शॉपिंगमध्ये काडीचा रस नाही आणि नवऱ्याला जवळजवळ ओढून शॉपिंग सेंटरमधून बाहेर काढावं लागतं.” असं म्हणत त्या “बायको मला शॉपिंगला जायचं… जाऊ दे न व, लई लई शॉपिंग करायचं… जाऊ दे न व”अश्या आवाजात एक कडवं गाताना म्हणते. तसेच या व्हिडिओला तिने ‘Shopping fever’ असं कॅप्शन दिलं आहे.

हे देखील वाचा – “देश की रक्षा के लिए दुश्मन की जान लेना…” बहुचर्चित ‘सॅम बहादूर’चा टीझर प्रदर्शित, विकी कौशलचा लूक पाहून भारावले प्रेक्षक

View this post on Instagram

A post shared by Snehal Tarde (@snehprat1311)

स्नेहलचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस पडत असून चाहते यावर कमेंट करत आहे. एक चाहता यावर म्हणाला, “खरंच अशी जोडपी खुप दुर्मिळ आहेत. पण याच जोडप्याचा आज अनेक जण आदर्श घेत आहेत.” तर दुसरा चाहती म्हणाली, “अगदी तुझ्यासारखं. आमच्याकडे पण माझा नवरा शॉपिंग करतो, आणि मी त्याची वाट बघत असते.” तिच्या या व्हिडिओची जोरदार चर्चा होत आहे.

Tags: marathi actresspravin tardepravin tarde and snehal tardesnehal tardeviral video
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Garbage Collector Passed 10th Exam
Women

पतीपासून विभक्त, लेकाचा एकटीने सांभाळ अन् …; पुण्यातील कचरा वेचणारी ‘ती’ झाली दहावी पास, प्रेरणादायी संघर्ष

मे 15, 2025 | 2:00 pm
Next Post
Vaishali Made Struggle

"त्या आठवणीही नको वाटतात…", भूतकाळाबद्दल बोलताना गायिका वैशाली माडे भावुक, म्हणाली, "मी रात्रभर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.