लोकप्रिय हिंदी टीव्ही रिॲलिटी शो ‘बिग बॉस’चं १७ वं सीझन सध्या जोरदार गाजत आहे. शोच्या पहिल्याच दिवसांपासून शोमधील स्पर्धक सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत आलेले आहेत. पण, याच शोमधल्या एका स्पर्धकाची सध्या बरीच चर्चा होताना दिसते. ती म्हणजे मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे. यंदाच्या सीझनमध्ये अंकिता पती विकी जैनसह सहभागी झाली. त्यानंतर दोघांमध्ये अनेकदा आपापसात खटके उडाल्याचं पाहायला मिळालं आहे. केवळ इतकंच नाही, तिचे अन्य स्पर्धकांबरोबर जोरदार भांडणेसुद्धा झाली. (Ankita Lokhande talks about her breakup with Sushant Singh Rajput)
एकीकडे या वादाची चर्चा होत असताना, अभिनेत्री या शोमध्ये तिचा एक्स बॉयफ्रेंड सुशांतसिंह राजपूतबाबत अनेक खुलासे केले. ज्याची सोशल मीडियावर सतत चर्चा होत आहे. २००९ मध्ये प्रसारित झालेल्या ‘पवित्र रिश्ता’ मधून अंकिता व सुशांत यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याचवेळेस, ते एकत्र आले होते. मात्र, अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर २०१६ मध्ये दोघांचा ब्रेकअप झाला. २०२० मध्ये सुशांतच्या आकस्मिक जाण्याने बॉलिवूडसह अभिनेत्रीला मोठा धक्का बसला होता. मात्र, त्याच्या निधनानंतर ती माध्यमांमध्ये बरीच चर्चेत आली होती. अशातच बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी अंकिताने एक मुलाखत दिली, ज्यामध्ये तिने सुशांतबरोबरच्या ब्रेकअपवर भाष्य करताना अनेक खुलासे केले.
काही दिवसांपूर्वी अंकिताने ‘बीबीसी न्यूज हिंदी’ला मुलाखत दिली. ज्यामध्ये तिने सुशांतबरोबरच्या ब्रेकअपबद्दल बोलताना असा खुलासा केला की, दोघांमध्ये सर्व सुरळीत होण्यासाठी तिने अडीच वर्ष वाट पहिली. तिने यावेळी सांगितलं की ती तिला सर्व गोष्टी पूर्वीसारख्या सुरळीत होण्याची आशा होती. मात्र तिच्या घरात दोघांचे इतके फोटोज होते, की ३१ जानेवारीला तिने हे सर्व फोटोज हटवण्याचा निर्णय घेतला. तिने हे सर्व फोटोज तिच्या आईला काढून टाकण्यास सांगितले. तिने स्वतःलाच सांगितले की, हे असं घडलं पाहिजे, कारण तिला तिच्या आयुष्यात दुसऱ्या व्यक्तीसाठी जागा बनवायची होती.
हे देखील वाचा – अंकिता लोखंडे गरोदर? ‘बिग बॉस १७’च्या घरात पहिल्यांदाच खरं काय ते बोलून गेली अभिनेत्री, म्हणाली, “मला आंबट खाण्याचं…”
पुढे अभिनेत्रीने तिच्या आईला असं सांगितलं होतं की, जोपर्यंत सुशांत आहे, तोपर्यंत तिच्या आयुष्यात दुसरा कोणताही व्यक्ती येणार नाही. पुढे ती तिच्या खोलीत गेली, आणि तिच्या आईने हे सर्व फोटोज हटवून फाडून टाकले. त्या दिवशी अंकिता खूप रडली आणि त्याचवेळेस या दोघांमध्ये सर्व काही संपले. पुढे ती म्हणाली की, तिने काही काळ वाट पहिली आणि सहा महिन्यानंतर विकी जैन तिच्या आयुष्यात आला. अखेर या दोघांनी डिसेंबर २०२१ मध्ये लगीनगाठ बांधली.
हे देखील वाचा – “फार गोड वाटते परदेशाची वारी…”, संकर्षण कऱ्हाडेने सादर केलेली कविता ऐकून तुम्हीही थक्क व्हाल, म्हणाला, “जेव्हा गोऱ्यांचं पोर…”
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात अंकिताने सुशांतच्या ब्रेकअपबद्दल पहिल्यांदाच मोकळेपणाने बोलली होती. ती त्यावेळी म्हणाली होती की जेव्हा सुशांतला यश मिळालं होतं, तेव्हा काही लोकांनी त्याला भडकवण्याचा प्रयत्न केला होता. तसेच, सुशांतने या ब्रेकअपबाबत कधीच स्पष्टपणे बोलला नाही. दरम्यान, सुशांतच्या निधनाबद्दल अभिनेत्रीने शोक व्यक्त करताना काही आठवणी शेअर केल्या होत्या. तसेच, या कठीण काळातही तिने अभिनेत्याच्या कुटुंबाच्या पाठीशी राहिली होती.