‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांना अगदी वेडं लावलं आहे. कार्यक्रमातील प्रत्येक कलाकारचं प्रेक्षकांशी अगदी वेगळं नातं जुळून आलं आहे. कलाकारांचा हटके अंदाज व भन्नाट विनोदीशैलीमुळे प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला अगदी डोक्यावर उचलून घेतलं. कार्यक्रमातील कलाकाराचं प्रत्येकाशी वेगळं असं नातं आहे. त्यांच्यातील नात्यांची गोडी नेहमी स्कीटमध्ये पण आपल्याला पाहायला मिळते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात दोन हटके विनोदी कलाकार म्हणजे अभिनेता ओंकार भोजने व अभिनेत्री नम्रता संभेराव, हे दोघं खऱ्या आयुष्यात एकमेकांचे मानलेले भाऊ-बहिण आहेत. नुकतीच त्यांची ‘इट्स मज्जा’ने भाऊबीज स्पेशल मुलाखत घेतली. यावेळी नम्रताने ओंकारकडे वहिनी आणण्याची मागणी केली.(namrata demands a sister in law from onkar)
या मुलाखतीत नम्रता व ओंकारला तुमच्या नात्यात कधी भांडणं होतात का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना नम्रता म्हणाली, “आमच्या नात्यात कधी भांडण नाही होत. मला भांडण असं आठवत नाही. पण मी त्याला नेहमी असं सांगत असते की, भाऊ माझा भाऊ…. पुढचे शब्द नाही सांगू शकत”, असं म्हणत तिने पुढे ओंकारकडे एक फरमाईश केली.
पुढे एक खास गाणं गात तिने, “दादा मला एक वहीनी आण”, असं सांगितलं. यावर ओंकारही मजेमजेत म्हणाला, “तु त्यांना विषय देतेस का?” या विषयावर ओंकार थोडा लाजलेला दिसला. या मुद्दयावर पुढे उत्तर देत नम्रताच म्हणाली, “माझ्या भावाचं सध्या कामावर म्हणजे अभिनयातवर लक्षकेंद्रित आहे. त्याच्यामुळे सध्या तो पूर्णपणे त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. खरंच तो पूर्णपणे त्याकडे एकाग्र आहे”. त्यावर ओंकारही म्हणतो, “ती एकाग्रता असायला हवीच”.
पण यासगळ्यात नम्रता पुन्हा म्हणते, “पण हा तरीही वहिनी असायला हवी. पण ठीक आहे माझाकडून काही जबरदस्ती नाही. त्याने त्याच काम चोख करावं. घरच्यांची, बहिणीची काळजी घ्यावी. बहिणीचं म्हणणं ऐकावं आणि बस छान काम करत रहावं”, असं म्हणत तिने ओंकारकडे मजेशीर रित्या वहिनीच्या मागणी केली. त्याचबरोबर तिने त्याला करिअरकडे लक्ष दे व स्वतःची काळजी घेण्याचाही सल्ला दिला.