बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री म्हणून पूजा सावंत हिचं नाव आवर्जून घेतलं जातं. आजवर पूजाने तिच्या अभिनयाने तसेच तिच्या सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. तरुणाईला तर अभिनेत्रीने तिच्या सौंदर्याने घायाळ केलं आहे. अशातच अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने प्रेमाची जाहीर कबुली दिली. ती प्रेमात पडल्याचं सांगत आयुष्यातला नवा प्रवास सुरू करत असल्याचं तिने म्हटलं होतं. (Pooja Sawant New Post)
अभिनेत्रीने दिलेल्या या आनंदाच्या बातमीनंतर अनेकांची मनंही दुखावली. सोशल मीडियावरून तिने तिच्या जोडीदाराचे फोटो शेअर करत साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सुरुवातीला तिने पाठमोरे फोटो शेअर करत तिने जोडीदाराचं नाव किंवा चेहरा दाखवला नव्हता. त्यानंतर अभिनेत्री पूजा सावंतने पुन्हा सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत तिचा जोडीदार कोण आहे याचा खुलासा करत नावही सांगितलं.
पूजा सावंतने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबरचे फोटो शेअर करत त्याचं नाव सांगतिलं. पूजा सावंतच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव सिद्धेश चव्हाण आहे. सिद्धेश चव्हाण अभिनेता वा इंडस्ट्रीतील व्यक्ती नसून तो ऑस्ट्रेलियामध्ये नोकरी करत असल्याची माहिती आहे. दोघांनी साखरपुडा सोहळा उरकला असल्याचं समोर आलं आहे. कारण पूजाने अंगठी फ्लॉन्ट करतानाचे फोटो चाहत्यांसह शेअर केले होते.
त्यानंतर आता पूजाने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. तिच्या या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पूजा तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या कुटुंबासह फिरायला गेली असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान पूजाने तिच्या पतीबरोबरचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टला तिने “तुझ्या येण्याने माझं आयुष्य आणखी रंगीन झालं आहे” असं कॅप्शन दिलं आहे. तर तिच्या नवऱ्याने म्हणजेच सिद्धेशने एकत्र कुटुंबाबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. सध्या पूजा तिच्या सासरच्या मंडळींसह क्वालिटी टाईम घालवताना दिसत आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट व लाईक्सचा वर्षाव होत आहे.