शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“स्त्रीत्व उत्तेजित पद्धतीने दाखवण्याला विरोध अन्…”, नीना कुळकर्णींनी सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाल्या, “थोबाडीत देईन…”

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 7, 2024 | 1:36 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi Actress Neena Kulkarni commented that she is against scenes that show femininity in an exciting way

अभिनेत्री नीना कुळकर्णींचं मी स्त्रीत्व उत्तेजित पद्धतीने दाखवणाऱ्या दृश्यांच्या विरोधात असल्याविषयी भाष्य

मराठीसह हिंदी मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून घराघरांत व प्रेक्षकांच्या मनात पोहोचलेल्या कलाकार म्हणजे अभिनेत्री नीना कुळकर्णी. त्यांनी अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. नीना कुळकर्णी यांनी त्यांच्या वास्तववादी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणाऱ्या नीना कुळकर्णी त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही तितक्याच लोकप्रिय आहेत. नीना कुळकर्णी यांनी अनेकदा अनेक विषयांवर स्पष्टपणे आपली मतं व्यक्त केली आहेत. अशातच त्यांनी नुकतंच एका मुलाखतीत मी स्त्रीत्व उत्तेजित पद्धतीने दाखवणाऱ्या दृश्यांच्या विरोधात असल्याचे भाष्य केलं आहे. (Neena Kulkarni On Titillation)

नीना कुळकर्णी यांनी नुकतीच ‘आरपार’ला मुलाखत दिली आणि या मुलाखतीत त्यांनी याबद्दल भाष्य केलं आहे. याबद्दल नीना यांनी असं म्हटलं की, “‘बादल’ नावाचा चित्रपट होता आणि त्यात जुगनी जुगनी नावाचा डान्स होता. जो आजही कधीकधी येतो तर मी डोळे मिटते. कारण मला त्यावेळी डान्स वगैरे शिकवलंच नव्हतं. कारण ज्या क्षेत्रात जायचं नाही तिथं गाणं, डान्सचा काही संबंधच नाही. तर त्यांनी मला सांगितलं की नीनाजी तुम्ही थोडं असं करा ना… यावर मी त्यांना नाही उत्तर दिलं. मी त्यांना म्हटलं की, मी दोन मुलांची आई आहे आणि मी हे असं करणार नाही आणि जरी आई नसते तरी मी हे केलं नसतं”.

आणखी वाचा – “दोन्ही वर्षी पुरस्कार न मिळाल्याने हिरमुसल्यासारखं…”, पुरस्कार न मिळण्यावरुन ऐश्वर्या नारकरांचं भाष्य, म्हणाल्या, “दुर्देवाने…”

यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “माझ्या मते आपलं स्त्रीत्व वेगळ्या आणि उत्तेजित पद्धतीने दाखवण्याच्या मी विरुद्ध आहे. तेव्हाही होती. आधी मी मॉडलिंग करत होते त्यावेळीही होती आणि मला असं वाटतं आज तर मला तसं कुणी विचारणारच नाही. जरी विचारलं तरी मी एक थोबाडीत देईन. किंवा जर ते त्या भूमिकेला पूरक असेल तरच ते करायचं. नाही तर नाही करायचं आणि मी नाही केलं. मी नाही केलं याचाही त्याने आदर केला. पदर पडायचा नाही म्हटलं तर मी नाही पाडणार. तुम्हाला पटतं. यावर तो “ठीक आहे” म्हणाला. इतका चांगला माणूस होता तो”.

आणखी वाचा – ठाण्यातील वाहतूक कोंडीला वैतागली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, म्हणाली, “मुली वाचवा, मुली शिकवा आणि मुलीला…”

‘बायोस्कोप’ , ‘मोगरा फुलला’ , ‘बादल’, ‘नायक’, ‘हंगामा, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ अशा अनेक मराठी व हिंदी चित्रपटांतून नीना कुळकर्णी यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. ‘देवयानी’, ‘ये है मोहब्बतें’, ‘उंच माझा झोका’, अधुरी एक कहानी’ अशा मालिकांतूनही त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. दरम्यान, सध्या त्या स्टार प्रवाहवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.

Tags: marathi actressneena kulkarniNeena Kulkarni Marathi News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Richa Chadha and Ali Fazal Baby Girl Name

रिचा चड्डा व अली फजलने ठेवलं लेकीचं नाव, अर्थ आहे फारच वेगळा, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.