‘कुंकू’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली मराठी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीत तिने स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मराठी नाटक, मालिका व चित्रपट यातून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मृण्मयी सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो, बहिणीबरोरचे मजेशीर व्हिडीओ तसेच तिच्या पतीबरोबरचे काही खास फोटोदेखील शेअर करत असते. अशातच तिने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मृण्मयीने अभिनय क्षेत्र तर गाजवलंच आहे. याशिवाय ती नुकतीच शेती व्यवसायाकडेही वळली आहे. अभिनेत्री अभिनयाबरोबर शेतीही करते. महाबळेश्वरमध्ये मृण्मयी पतीसह शेती व्यवसाय देखील करते. तिच्या या शेती व्यवसायाबद्दल मृण्मयीची माहिती सोशल मीडियावर शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसद मिळतो. अशातच मृण्मयीने तिच्या या महाबळेश्वरमधील शेतातील पाळीव श्वानांचा व्हिडीओ शेअर केला आहे.
मृण्मयीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिचे पाळीव श्वान घराच्या छतावर जाऊन मस्ती करत असल्याचे तिने या व्हिडीओमध्ये सांगितले आहे. यामध्ये ती तिच्या पाळीव श्वानांना घराच्या छतावरुन खाली उतरण्यासदेखील सांगत आहे. मात्र ते तिचे काहीही न ऐकताच मस्ती करत आहेत. या व्हिडीओला अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. मात्र या व्हिडीओखालील एका कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
एका नेटकऱ्याने या व्हिडीओखाली “हे दोघे किती मूर्ख आहेत” असं म्हटलं आहे. नेटकऱ्याच्या या कमेंटवर मृण्मयीनेही हटके उत्तर दिले आहे. “हे दोघेही तुझ्यावर गेले आहेत” असं म्हणत मृण्मयीने नेटकऱ्याला उत्तर दिले आहे. दरम्यान, मृण्मयीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती नुकतीच ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटाला तसा फार प्रतिसाद मिळाला नाही. अशातच ती आता कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार? याची अनेक चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.