मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तुला शिकवीन…’मधील अधिपतीचे वडील चारुहास यांची खऱ्या आयुष्यातील मुलगीही आहे अभिनेत्री, मराठी इंडस्ट्रीमध्ये करत आहे कमालीचं काम

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 14, 2024 | 4:37 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Swapnil Rajshekhar Daughter

'तुला शिकवीन...'मधील अधिपतीचे वडील चारुहास यांची खऱ्या आयुष्यातील मुलगीही आहे अभिनेत्री, मराठी इंडस्ट्रीमध्ये करत आहे कमालीचं काम

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रेम देताना दिसत आहेत. मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहे. सध्या मालिकेत अक्षरा व अधिपती यांच्यात फुलत जाणार प्रेम पाहायला मिळत आहे. अक्षराला अधिपतीवरील तिच्या प्रेमाची कबुली द्यायला अधिपतीचे वडील चारुहास यांनी सांगितलेलं असतं. मालिकेत अक्षराला चारुहास यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचं पहिल्या दिवसापासून पाहायला मिळालं आहे. (Swapnil Rajshekhar Daughter)

अधिपती जरी चारुहासला त्याचा बाबा म्हणत नसला तरी चारुहासला कायमचं अधिपतीबाबत काळजी असते. शिवाय भुवनेश्वरीपासून नेहमीच तो तिची सुटका करत असतो. तर चारुहास हा अक्षराला सून म्हणून नाही तर लेक म्हणूनचं स्वीकारतो आणि तिची काळजी घेत असतो. चारुहास म्हणजेच अभिनेते स्वप्नील राजशेखर हे खऱ्या आयुष्यातही बाबा आहेत. घरातच अभिनयाचे बाळकडू लाभलेल्या अभिनेता स्वप्निल राजशेखर यांनी आजवर विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. नायक, खलनायक तर कधी चरित्र व्यक्तिरेखांमध्ये स्वप्नील नेहमीच पाहायला मिळाले. त्यांची लेक कृष्णा राजशेखर ही देखील सिनेसृष्टीत कार्यरत आहे.

आणखी वाचा – Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या गावातील घरावर चढले तिचेच दोन्ही पाळीव श्वान, खेळत राहिले अन्…; कमेंट करणारीला दिलं सडेतोड उत्तर

View this post on Instagram

A post shared by Krushna Rajshekhar???? (@krushna_rajshekhar)

स्वप्नील यांची लेक कृष्णा राजशेखर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. याआधी कृष्णाने मालिका व नाटकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका करत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. सोशल मीडियावरही कृष्णा बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती तिच्या वडिलांबरोबरचे अनेक रील व्हिडीओ शेअर करत असते. कृष्णाही कथक डान्सर आहे. त्यामुळे ती उत्तम डान्स व्हिडीओ शेअर करताना दिसते.

आणखी वाचा – “जेमिनी असेल घरी तर…”, बायकोने वाढदिवसादिवशी प्रेम व्यक्त करताच सिद्धार्थ चांदेकरने दिलं भन्नाट उत्तर, म्हणाला, “आनंदाची…”

कृष्णाने आजवर चाणक्य या नाटकांत सुमोहाच्या भूमिकेत दिसत आहे. तर ‘लवंगी मिरची’, ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकांमध्येही कृष्णाने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. याशिवाय ‘हिमालयाची सावली’ या नाटकांत कृष्णाबाई ही भूमिका तिने साकारली. तिची ही भूमिकाही विशेष गाजली. सध्या कृष्णा चाणक्य या नाटकांतून रंगभूमी गाजवताना दिसत आहे. वडील व मुलीचे सिनेसृष्टीतील काम साऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.

Tags: krushna rajshekharmarathi actressmarati actorSwapnil Rajshekhar Daughter
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
Tula Shikvin Changlach Dhada bts video see the details

'तुला शिकवीन चांगलाच धडा'चं असं होतं शूट, टीव्हीवर दिसणारा बंगला आतून दिसतो असा, Inside Video समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.