शुक्रवार, एप्रिल 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘संघर्षयोद्धा’च्या ट्रेलरमध्ये जरांगे पाटील, छगन भुजबळ, सदावर्तेंच्या डायलॉगबाजीची चर्चा, हुबेहुब भूमिका, व्हिडीओ पाहिलात का?

Saurabh Moreby Saurabh More
जून 14, 2024 | 12:32 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sangharshyoddha Manoj Jarange Patil movie new trailer released Chhagan Bhujbal and Adv. Gunaratna Sadavarte roles grab attention.

'संघर्षयोद्धा'च्या ट्रेलरमध्ये जरांगे पाटील, छगन भुजबळ, सदावर्तेंच्या डायलॉगबाजीची चर्चा, हुबेहुब भूमिका, व्हिडीओ पाहिलात का?

मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या उपोषण आंदोलनमुळे मनोज जरांगे पाटील यांचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. मनोज जरांगेंच्या याच जीवनप्रवासाचे चित्रण करणारा ‘संघर्षयोद्धा- मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट येत्या १४ जूनला प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. अशातच आता या चित्रपटाचा आणखी एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक भूमिका मांडत आहेत. मात्र, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास छगन भुजबळ यांनी विरोध केला, तर ॲड. गुणरत्न सदावर्ते मराठा आरक्षणाच्या विरोधात असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे या चित्रपटातील छगन भुजबळ व गुणरत्न सदावर्ते यांच्या भूमिका कोण करणार? याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती आणि ही इच्छा पूर्ण झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Music Marathi (@zeemusicmarathi)

आणखी वाचा –

या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला असून, छगन भुजबळ यांची भूमिका अभिनेते संजय कुलकर्णी यांनी साकारली आहे तर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका शिवाजी दोलताडे यांनी साकारली आहे. त्यांच्या या भूमिकांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. मराठा आरक्षणात छगन भुजवळ व ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रत्येक भूमिकेकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष होते. त्यामुळे आरक्षणासाठी आग्रही भूमिका, आरक्षणावरील आक्षेप, विरोध असा संघर्षही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा –

दरम्यान, ‘संघर्षयोद्धा’ या चित्रपटात अभिनेता रोहन पाटील याच्यासह संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Tags: marathi entertainment newsmarathi movieSangharshyoddha Manoj Jarange Patil
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 divyanka sirohi death reason
Entertainment

सुप्रसिद्ध पंजाबी अभिनेत्रीचे वयाच्या ३०व्या वर्षी निधन, घरीच मृतावस्थेत आढळली, मृत्यूचे कारण…

एप्रिल 23, 2026 | 3:00 pm
veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Next Post
Aai Kuthe kay karte Promo

कांचन आजींची प्रकृती खालावली, आयसीयूमध्ये दाखल, संजना-अनिरुद्धमुळेच जीवाला धोका

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.