‘जुळून येती रेशीमगाठी’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ताने तिच्या सहजसुंदर अभिनेयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अनेक मालिका व चित्रपटांमधून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अभिनेत्री असण्याबरोबरच ती एक उद्योजिकादेखील आहे. ‘प्राजक्तराज’ नावाचा तिचा स्वत:चा दागिन्यांचा ब्रॅंड आहे. अशातच नुकताच प्राजक्ताने एक फार्महाऊसदेखील घेतला आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या या फार्महाउसचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (Prajakta Mali On Instagram)
नुकताच प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे काही फोटो शेअर केले आहेत. प्राजक्ताने घेतलेल्या नवीन फार्महाऊसची वास्तुशांती होती. त्यानिमित्ताने प्राजक्ताचे आजी व आजोबा इथे मुंबईत आले आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर प्राजक्ताने काही खास क्षण घालवले व या खास क्षणांना तिने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. तसेच या फोटोखाली तिने “आजी-आजोबा (आईचे आई वडील) वास्तूशांतीसाठी खास पंढरपूरातून आले.” असं म्हटले आहे.
त्याचबरोबर या फोटोत प्राजक्ताचे आई-वडील, भाऊ-वहिनी, आजी-आजोबा व त्यांच्या भाच्या अशा चार पिढ्या दिसत आहेत. त्यामुळे “प्राजक्तकुंज वर ४ पिढ्या” असंही म्हटलं आहे. त्याचबरोबर प्रेमाचे बंध असलेले मजबूत रक्ताचे नाते हा एक आशीर्वाद आहे आणि अनेक अडचणी असूनही आजी-आजोबा कुंज (फार्महाऊस)ला भेट देऊ शकले. याचा मला आनंद आहे” असं म्हणत तिने तिच्या कुटुंबियांबरोबरचे खास फोटो शेअर केले आहेत. प्राजक्ताने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिच्या फर्महाऊसची वास्तुशांती होतानाचे खास क्षण प्राजक्ताने चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
आणखी वाचा – रुपालीकडून अद्वैतनंतर आता नेत्रा-इंद्राणीच्या जीवाला धोका, मालिकेला नवं वळण, प्रेक्षकही चक्रावले
दरम्यान, प्राजक्ताने शेअर केलेल्या या फोटोखाली तिच्या अनेक चाहत्यांनी तिला या नवीन फार्महाऊससाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर या नवीन फार्महाऊससाठी तिचे कौतुकही केले आहे. “खुप छान, खूपच मोठं घर आहे, सुंदर फॅमिली” अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी प्राजक्ताच्या पोस्टला उत्तम प्रतिसाद दिला आहे.