शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुझ्या नवऱ्याला चालतं, आधी नग्नपणा…”, बिकिनीवरुन मिताली मयेकर ट्रोल, अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली, “अहो काकू तुम्ही…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 9, 2023 | 1:09 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
mitali mayekar bikni photo troll

“तुझ्या नवऱ्याला चालतं, आधी नग्नपणा...”, बिकिनीवरुन मिताली मयेकर ट्रोल, अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली, “अहो काकू तुम्ही...”

सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार मंडळी चाहत्यांशी अधिकाधिक संवाद साधतात. विविध फोटो व व्हिडीओही कलाकार सातत्याने शेअर करतात. जगभरातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया प्रभावी माध्यम झालं आहे. पण याचे काही तोटेही आहेत. कलाकारांनी एखादा फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट केला की, कित्येकजण त्यावर आपली मतं मांडताना दिसतात. बऱ्याच प्रमाणामध्ये टीका होते. ट्रोलिंगचा अधिकाधिक सामना कलाकारांना करावा लागतो. सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री मिताली मयेकरलाही याचा बराच अनुभव आला आहे. बिकिनी परिधान केल्यानंतर ट्रोल करणाऱ्यांना तिने सडेतोड उत्तर दिलं आहे.

काही दिवसांपूर्वी मितालीने बीचवरील फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये तिने बिकिनी परिधान केली असल्याचं दिसलं. मितालीने फोटो शेअर केल्यानंतर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. “हिच का मराठी संस्कृती” म्हणत नेटकऱ्यांनी तिला सुनावलं. आता ट्रोल करणाऱ्यांना तिने सडेतोड उत्तर दिलं आहे. बीचवर साडी परिधान केलेला एका व्हिडीओ मितालीने शेअर केला.

आणखी वाचा – Video : याला म्हणतात देशमुखांच्या सूनेचे संस्कार, रस्त्यावरील मुलं भेटायला आल्यावर जिनिलियाने काय केलं पाहा, व्हिडीओ व्हायरल

साडी परिधान केलेला व्हिडीओ शेअर करत तिने म्हटलं की, “मी कोणतेही कपडे परिधान केले तरी माझी मुळं मी कधीच विसरणार नाही. अभिमान आहे मला मी मराठी असल्याचा आणि माझ्या मराठी संस्कृतीचा”. मितालीच्या या व्हिडीओवरही अनेक कमेंट करत तिला सुनावलं पण या सगळ्यांना तिने उत्तर दिलं आहे. “आधी नागडेपणा आणि नंतर संस्कृतीचा अपमान, व्हा” असं एका युजरने कमेंट केली. कमेंटमध्ये या युजरने संस्कृती शब्द चुकीचा लिहिला. यावर मिताली म्हणाली, “दादा तुम्हाला संस्कृती म्हणायचं होतं का? ओके”.

View this post on Instagram

A post shared by Mitali Mayekar Chandekar ???? (@mitalimayekar)

आणखी वाचा – “कौतुकाने खायला थांबले पण…”, भूक लागलेली असताना ‘श्री दत्त स्नॅक्स’ने दिलेले पोहे बघूनच भडकली मुक्ता बर्वे, म्हणाली, “पैसे गेल्याचं दुःख…”

“मराठी संस्कृती तुमच्या बुद्धीच्या आकलनाच्या पलिकडे आहे. असे प्रयत्न करु नका. बिकिनी घाल किंवा नको घालू हा मुद्दाच नाही. तुझ्या नवऱ्याला चालत असेल तर कुणी दुसऱ्याने बोलायची गरज नाही. पण कोणी काम द्यावं या आशेने अंगप्रदर्शन करणाऱ्या मराठी अभिनेत्रींची कमी नाही” अशी दुसऱ्या एका युजरने कमेंट केली. ही कमेंट पाहून मिताली संतापली. म्हणाली, “संस्कृती व काम कसं आत्मसात करायचं याचे क्लासेस तुम्ही घेता का काकू? प्लीज घ्या. अशा क्लासेसला मला यायला आवडेल”. मितालीने ट्रोल करणाऱ्यांची बोलती बंद केली आहे.

Tags: marathi actressmarathi moviemarathi serialmitali mayekar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
amey khopkar angry after watch aatmapamphlet movie

"मराठीची अवस्था बिकट…", ‘आत्मपॅम्फ्लेट’ पाहायला थिएटरमध्ये फक्त पाच प्रेक्षक, मनसेचे अमेय खोपकर यांचा संताप, म्हणाले, "प्रेक्षक मिळत नसतील तर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.