रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“प्रोमो पाहून प्रेक्षक हलले”, मालिकेतील नव्या ट्विस्टबाबत ‘आई कुठे…’ फेम अरुंधतीने केलं भाष्य, म्हणाली, ” मी स्वतः…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 13, 2024 | 11:54 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Madhurani Prabhulkar On Aai kuthe kay karte

"प्रोमो पाहून प्रेक्षक हलले", मालिकेतील नव्या ट्विस्टबाबत 'आई कुठे…' फेम अरुंधतीने केलं भाष्य, म्हणाली, " मी स्वतः…"

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या गेली सव्वाचार वर्षे प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करत आहे. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका अव्वल असलेली पाहायला मिळाली आहे. मालिकेत येणाऱ्या चढ-उतारांमुळे ही मालिका नेहमीच चर्चेत असते. या मालिकेतील अरुंधती, अनिरुद्ध, संजना, आशुतोष ही पात्रे घराघरांत पोहोचली आहेत. मात्र, काही दिवसांपासून मालिकेमध्ये नवनवीन ट्विस्ट येताना दिसत आहेत. हे ट्विस्ट प्रेक्षकांना आवडेनासे झाले असल्याने ही मालिका बंद करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. (Madhurani Prabhulkar On Aai kuthe kay karte)

अशातच मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. हा प्रोमो बघून प्रेक्षक खूपच भडकल्याचे दिसून येत आहे. या प्रोमोमध्ये आशुतोषचे निधन झाले असल्याचं दाखवलं आहे. आशुतोषच्या निधनाने अरुंधतीला मोठा धक्का बसला आहे. या सगळ्याला आशुतोषची आई अरुंधतीला जबाबदार धरते. तेवढ्यात अरुंधतीची आधीची सासू कांचन तिथे येते आणि ती अरुंधतीच्या बाजूने ठामपणे उभी राहते. हा प्रोमो पाहून आता अरुंधतीनेही या मालिकेतील ट्विस्टवर भाष्य केलं आहे. स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्याला अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकरने हजेरी लावली होती. यावेळी ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत तिने मालिकेच्या या नव्या ट्विस्टबाबत भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – क्रिती खरबंदाच्या होणाऱ्या नवऱ्याचे याआधीही झाले आहे एक लग्न, अन् ‘या’ अभिनेत्रींबरोबर रंगल्या आहेत अफेअर्सच्या चर्चा

या सोहळ्याला मधुराणीने टिशूची साडी आणि डिझाइनर ब्लाउज परिधान केला होता. तसेच हॅन्ड क्राफटेड असे दागिने तिने घातले होते. मॉडर्न टच दिलेला हा अरुंधतीचा पारंपरिक लूक साऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेबद्दल बोलताना मधुराणी म्हणाली की, “जवळजवळ सव्वाचार वर्ष या मालिकेला झाली आहेत. आणि यंदाच्या स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात हे चौथ नॉमिनेशन आहे. इतकी वर्ष होऊनही प्रेक्षकांना ही मालिका तितकीच आवडते, अरुंधतीवर प्रेक्षक इतकं प्रेम करतात की ते शब्दात सांगू शकत नाही. त्यासाठी मी स्टार प्रवाहचे आभार मानेन”.

आणखी वाचा – “आमच्या राज्यात हा कायदा नको”, CAA लागू करण्यावर थलपती विजयची केंद्र सरकारवर टीका, सरकारला आवाहन करत म्हणाला…

मालिकेच्या नव्या प्रोमोबाबत बोलताना अरुंधती म्हणाली, “प्रोमो पाहून प्रेक्षक हलले. आशुतोष हे पात्र सर्वांना पाहायला आवडायचं आणि आमचा रोमान्स बघायला आवडायचा. पण आता खूप मोठा ट्विस्ट समोर आला आहे आणि मी स्वतः मधुराणी म्हणूनही या ट्विस्टला पचवू शकले नाही आहे. आशुतोष म्हणजे ओंकार हा माझा चांगला मित्र आहे. सेटवरही आमचं बॉण्डिंग खूप मस्त होत. आता तो नसणार याचं खूप दुःख आहे”.

Tags: Aai Kuthe Kay Karte new Promoaai kuthe kay karte trollmadhurani prabhulkarMadhurani Prabhulkar On Aai kuthe kay kartemarathi actressmarathi serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
trishala dutt on sanjay dutt

“आई-वडील नसणं हे फायद्याचं असतं”, संजय दत्तची लेक त्रिशला असं का म्हणाली?, कारण सांगत पोस्टही केली शेअर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.