अभिनेत्री हेमांगी कवी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तिच्या नवीन कामाविषयी माहितीसुद्धा ती सोशल मीडियावर शेअर करत असते. हेमांगी तिच्या अभिनयामुळे जितके चर्चेत असते तितकीच ती तिच्या स्पष्टवक्तेपणा आणि बिनधास्तपणामुळेदेखील कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगकडे बरेच कलाकार दुर्लक्ष करतात, मात्र हेमांगी ही ट्रोलर्सना उत्तर द्यायला नेहमीच तयार असते. (Hemangi Kavi On Instagram)
हेमांगीला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केले गेले आहे आणि तिनेही प्रत्येकवेळी ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. अशातच तिला पुन्हा एकदा ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. हेमांगीने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओखाली एकाने अश्लील कमेंट करत तिला ट्रोल केले आहे. या व्हिडीओत हेमांगी चालत येत असून बॅकग्राऊंडला एक गाणं वाजत आहे. दरम्यान या व्हिडीओखाली एकाने तिला चालताना पाहून शरीराच्या एका अवयवावर अश्लील कमेंट केली आहे. या कमेंटवर उत्तर देत तिने या ट्रोलर्सला चांगलेच सुनावले आहेत. यासंबंधीत एक पोस्ट शेअर करत तिने या ट्रोलर्सचा समाचार घेतला आहे.
हेमांगीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने असं म्हटलं आहे की, “Bio (इन्स्टाग्राम बायो) मध्ये लिहिताना छत्रपती शिवाजी महाराज, गणपती बाप्पा, इंडियन आर्मी आणि प्रत्यक्षात हे असं वागणं?, ही अशी जनावर वृत्तीची माणसं समाजात हिंडताना माणसाची कातडी घालून समाजात वावरतात. पण ती जनावरचं असतात. चित्रपट किंवा नाटक हे काल्पनिक असतात. पण आपल्या आजूबाजूला अशी खरीखुरी माणसं आहेत. हे वार करतात आणि पकडलेही जात नाहीत. हे कुठल्याही चित्रपट किंवा नाटकापेक्षा घातक असून ही माझ्यासाठी एक प्रकारची हिंसाच आहे.
तसेच हेमांगीने तिच्यावरील या अश्लील कमेंटला इन्स्टाग्राम स्टोरीमध्य मेन्शन करत असं म्हटलं आहे की, “मी हे स्टोरीमध्ये पोस्ट केल्यावर या व्यक्तीने ही कमेंट डिलीट केली आहे. यांमुळे त्याला त्याच्या बायोमध्ये उल्लेख केलेल्या लोकांची आठवण आली असावी”. दरम्यान, तिच्या या पोस्टमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हेमांगीने नुकतीच “ताली” या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. सध्या ती एका हिंदी मालिकेत काम करत आहे.