गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“थिएटर्स मिळवताना मारामारी अन्…”, देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट, म्हणाला, “अधिवेशनात विषय मांडला आणि…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 7, 2023 | 7:28 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
maharashtrachi hasyajatra fame actor prasad khandekar shared post about ekda yeun tar bagha movie not getting theatre screens and dcm devendra fadanvis assured him

“थिएटर्स मिळवताना मारामारी अन्...”, देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट, म्हणाला, “अधिवेशनात विषय मांडला आणि...”

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शो मधून घराघरात पोहोचलेला विनोदवीर म्हणजे प्रसाद खांडेकर, प्रसाद खांडेकर हा अभिनेता असण्याबरोबरच लेखकही आहे. नुकताच तो दिग्दर्शन क्षेत्रातही उतरला आहे. उद्या (८ डिसेंबर) तोजी त्याचा ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असून सध्या सर्वत्र याच चित्रपटाची चर्चा सुरू आहे. गेलेब काही दिवस या चित्रपटाचे प्रमोशन चालू होते. मात्र सध्या तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे आणि ते कारण म्हणजे मराठी चित्रपटाला चित्रपटगृहात मिळणारे स्थान. याच मुद्द्यावर नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा घेतला गेला. प्रवीण दरेकर यांनी हिवाळी अधिवेशनात मराठी चित्रपट व चित्रपटगृहांबद्दलचा मुद्दा उपस्थित केला होता. अभिनेत्याने याचाच व्हिडीओ शेअर करत त्याचे मत मांडले आहे.  (Prasad Khandekar On Instagram)

या पोस्टमध्ये प्रसादने असं म्हटले आहे की, “स्ट्रगल इथले संपत नाही. ‘एकदा येऊन तर बघा’ सिनेमा ८ डिसेंबर पासून सर्वत्र प्रदर्शित होतो आहे. आत्तापर्यंत बऱ्याचदा असं झालं की, मराठी सिनेमांना थिएटर्स मिळताना खूप मारामार करावी लागते. ज्या सिनेमाच्या पाठीशी मोठे बॅनर आणि मोठे प्रोडक्शन हाऊस असतात त्यांच्या नशिबात आरामात थिएटर्स मिळतात. पण हा आतापर्यंतचा अनुभव फक्त वाचून आणि ऐकून होतो. पहिल्यांदा हा अनुभव आता मला माझ्या पहिल्याच सिनेमाच्याबाबतीत आला. मुळात सगळेच मराठी सिनेमे थिएटरमध्ये चालावेत म्हणून आधीच मी इतर दोन मराठी सिनेमांची रिलीज डेट जाहीर झाल्यामुळे माझ्या सिनेमाची रिलीज डेट दोनदा पुढे ढकलून दीड महिने आधीच २४ नोव्हेंबर ही तारीख जाहिर केली. जेणेकरुन त्यावेळी जर कोणी रिलीज करणार असतील तर मराठी सिनेमांची आपापसात स्पर्धा व्हायला नको. तरीही एका मोठ्या मराठी सिनेमाची त्या दिवशी रिलीज डेट जाहिर झाली. आता या सिनेमातील ही सगळेच मित्र मैत्रिणी असल्या कारणाने आणि पुन्हा एकाच दिवशी रिलीज करून पुन्हा स्पर्धा नको म्हणून डिस्ट्रिब्युटरसह चर्चा करून पूर्ण पब्लिसिटी झालेली असतानासुद्धा सिनेमा अजून दोन आठवडे पुढे ढकलला आणि ८ डिसेंबरला रिलीज करण्याच ठरवलं. ८ डिसेंबरला थिएटर्स आणि स्क्रिन्स नक्की मिळतील असं आश्वासन मिळालं.”

View this post on Instagram

A post shared by Prasad Khandekar (@prasadmkhandekarofficial)

आणखी वाचा – “अशी जनावरं…”, शारीरिक भागावरुन अश्लील कमेंट करणाऱ्यावर हेमांगी कवी भडकली, म्हणाली, “Bioमध्ये छत्रपती शिवाजी महाराज अन्…”

यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “परंतू आता शुक्रवारी चित्रपट रिलीजवर असताना बुधवार रात्र आली तरी सिनेमाला थिएटर आणि स्क्रिन्स मिळत नव्हते. बरं जे मिळाले ते हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आणि छोटे स्क्रिन त्यातही सकाळ आणि दुपारचे शोज मिळत होते. सोशल मीडियावरून प्रेक्षक थेट विचारत होते की सिनेमा आमच्या भागातल्या थिएटर्सना दिसत नाही. मी बोरिवलीमध्ये राहायला. माझ्या स्वतःच्या घरच्यांना सिनेमा पाहायचा आहे. पण जवळच्या थिएटरमध्ये शोच नाही. मग हे घडलं. कलाकार असल्यामुळे सगळ्याच पक्षाच्या सगळ्याच लोकांबरोबर खूप छान संबंध आहेत. आज सकाळी मा. प्रविण भाऊ दरेकर यांच्याबरोबर बोलताना मी त्यांना झालेला प्रकार सांगितला आणि त्यांनी तो तात्काळ अधिवेशनात मांडला आणि चक्र फिरली.”

आणखी वाचा – Video : आईचं निधन, पडता काळ अन्…; सुप्रिया पाठारे पुन्हा हॉटेल सुरु करणार, पोस्ट शेअर करत म्हणाल्या, “दोन महिन्यांनंतर…”

दरम्यान, या पोस्टमध्ये प्रसादने “प्रवीण भाऊ दरेकर, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मा. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत त्याचबरोबर त्याचा वर्गमित्र सागर बागुल यालाही धन्यवाद म्हटले आहे. तसेच हे फक्त माझ्याच सिनेमाच्या बाबतीतील म्हणणं नाही तर सगळ्याच मराठी सिनेमांना योग्य न्याय मिळाला पाहिजे.” असंही त्याने म्हटलं आहे. ‘एकदा येऊन तर बघा’ सिनेमात दिग्गज कलाकारांची फौज आहे. सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार, ओंकार भोजने, भाऊ कदम, वनिता खरात, रोहित माने असे कलाकार आहेत.

Tags: ekda yeun tar baghamarathi actormarathi entertainmentMarathi newsprasad khandekar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
upendra limaye shared the story of tea and spotboy

"स्पॉटबॉयने माझ्या मुस्काटात…", मिळालेल्या प्रसिद्धीमुळे उपेंद्र लिमयेंची बदलली होती वागणूक, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाले, "माझा अहंकार दुखावला अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.