सोमवार, मे 19, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“रिलेशनशिपला कुटुंबियांकडून विरोध आणि…”, बॉयफ्रेंड अजिंक्य ननावरेबाबत बोलताना शिवानी सुर्वेचा खुलासा, म्हणाली, “फक्त आकर्षण…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 7, 2023 | 4:40 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
marathi actress shivani surve talk about her releationship with boyfriend ajinkya nanaware know about lovestory

“रिलेशनशिपला कुटुंबियांकडून विरोध आणि...”, बॉयफ्रेंड अजिंक्य ननावरेबाबत बोलताना शिवानी सुर्वेचा खुलासा, म्हणाली, “फक्त आकर्षण...”

कलाकार आपल्या खासगी आयुष्याबाबत बऱ्याचदा बोलणं टाळतात. पण शिवानी सुर्वे याला अपवाद आहे. शिवानी गेल्या काही वर्षांपासून ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’मधील अद्वैत म्हणजे अजिंक्य ननावरेला डेट करत आहे. ‘बिग बॉस मराठी’मध्ये आल्यानंतर शिवानीने याबाबत भाष्य केलं होतं. आता दोघंही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. याचबाबत नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शिवानीने भाष्य केलं आहे. तसेच ती तिच्या नात्याबाबत खुलेपणाने बोलली आहे. गेल्या काही वर्षांपासून अजिंक्य व शिवानी एकमेकांना डेट करत आहेत. याचबाबत ‘दिले के करीब’ या कार्यक्रमात शिवानीने भाष्य केलं.

अजिंक्यबरोबरच्या नात्याबाबत शिवानीला विचारताच ती म्हणाली, “अजिंक्य व मी २०१५मध्ये एकत्र मालिका करत होतो. स्टार प्रवाह वाहिनीवर ‘तू जीवाला गुंतवावे’ ही ती मालिका होती. मालिका सुरु झाल्यानंतर काही दिवसांनंतर त्याची कथानकमध्ये एन्ट्री झाली. पण त्याच्या एन्ट्रीनंतर तीन महिन्यांनी मालिकाच बंद झाली. तेव्हा फक्त मैत्री होती. पण मालिका बंद झाल्यानंतर असं वाटलं की, काहीतरी वेगळं आहे. काम करत असताना इतरांमध्ये आपण जास्त लुडबूड करत नाही. पण अजिंक्यच्या गोष्टींमध्ये मला लुडबूड करावीशी वाटली. तेव्हापासून आतापर्यंत मी त्याच्या प्रत्येक गोष्टींमध्ये लक्ष देतच आहे”.

View this post on Instagram

A post shared by ???????????????????????????? ???????????????????????? ???????????????????????????????? (@ajinkya_nanaware)


आणखी वाचा – हिंदी चित्रपटांच्या गर्दीतही ‘झिम्मा २’ला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद, सुबोध भावेची पोस्ट चर्चेत, म्हणाला, “आमचा मराठी चित्रपट…”

“तो खूपच चांगला आणि शांत आहे. माझ्या जवळच्या लोकांशी जेवढं मी बोलते किंवा व्यक्त होते त्याच्या अगदी विरुद्ध अजिंक्य आहे. माझ्यापेक्षा जरा जास्तच शांत व समजुतदार आहे. मालिका संपल्यानंतर भेटणं, दिवसभर एकत्र राहणं सुरु झालं. त्यानंतर दोघांमध्ये काहीतरी नातं आहे याची जाणीव झाली. आम्ही एकमेकांना अजूनही प्रपोज केलं नाही. फक्त गोष्टी घडत गेल्या आणि आज आम्ही एकत्र आहोत. २०१५-१६मध्ये आम्ही रिलेशनशिपची सुरुवात केली. २०१७मध्येच आम्ही आमच्या घरी नात्याबाबत सांगितलं होतं. मी माझ्या आईला आणि त्याने त्याच्या आई व आजीला सांगितलं होतं. दोन्ही घरामधून आमच्या नात्याला प्रचंड विरोध होता. त्यांचं असं म्हणणं होतं की, हे फक्त एकमेकांबाबतचं आकर्षण आहे. जर तुम्हाला वाटत असेल की, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवावा तर तुम्ही एकत्र राहून दाखवा. अजूनपर्यंत आम्ही त्यांना एकत्र राहून दाखवत आहोत”.

आणखी वाचा – Video : ‘बिग बॉस मराठी’ फेम अक्षय केळकरला मुंबईत मिळालं म्हाडाचं घर, आईच्या वाढदिवसानिमित्त गृहप्रवेश व पूजा केली अन्…; व्हिडीओ व्हायरल

“लॉकडाऊनमध्येच त्यांना विश्वास बसला की, आम्ही एकत्र राहू शकतो. आम्ही दोघं आयुष्यभर एकत्र राहू हे त्यांना लॉकडाऊननंतर पटलं. अजिंक्यचे बाबा म्हणाले की, लॉकडाऊन तुम्ही न भांडता काढू शकता तर तुम्ही एकत्र राहू शकता. खरं तर चार वर्षांनंतर कुटुंबियांकडून आम्हाला होकार मिळाला. खूप लवकर आम्ही आनंदाची बातमी देऊ. सगळं ठरलं आहे फक्त आता सांगायचं बाकी आहे”. शिवानीच्या बोलण्यावरुन अजिंक्यबरोबर ती लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं दिसून येत आहे.

Tags: entertainmententertainment newsmarathi actressmarathi entertainmentMarathi newsshivani surve
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Sharmila Shinde Shares Experience
Entertainment

“सीनमध्ये बाळ गेलं पण…”, ‘नवरी मिळे…’मधल्या दुर्गाला खऱ्या आयुष्यात झाला शारिरीक त्रास, म्हणाली, “रडले, रागावले…”

मे 19, 2025 | 7:00 pm
achint kaur struggle for work
Entertainment

१८व्या वर्षातच लग्न, घटस्फोट, बॉयफ्रेंडचीही पाठ; आता कामासाठी वणवण फिरतेय सुप्रसिद्ध अभिनेत्री, ओळखणंही कठीण

मे 19, 2025 | 6:38 pm
worms and fungus in dairymilk Cadbury
Entertainment

कॅडबरीमध्ये अळ्या, बुरशी अन्…; साताऱ्याच्या डी-मार्टमधील धक्कादायक प्रकार, मराठी अभिनेत्रींनी शूट केला व्हिडीओ

मे 19, 2025 | 5:45 pm
Shilpa shirodkar corona positive
Entertainment

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला करोना, मुंबईत पुन्हा वाढले रुग्ण, आता परिस्थिती अशी की…

मे 19, 2025 | 4:55 pm
Next Post
suruchi adarkar mehendi function

Video : पियुष रानडेच्या तिसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा, मेहंदी कार्यक्रमही थाटात केला अन्…; व्हिडीओमध्ये नाचताना दिसली सुरुची अडारकर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.