Riteish Deshmukh Bad Behaviour : नेहमीच हसत खेळत दिसणारी बॉलिवूड विश्वातील जोडी म्हणजे रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख. रितेश आणि जेनेलिया यांच्या संस्कारांचं तसेच त्यांच्या मुलांवरील संस्कारांचं नेहमीच कौतुक होताना पाहायला मिळतं. ही जोडी कधी ट्रोलिंगची शिकार झालीय असं कानावर क्वचितच. नेहमीच प्रेक्षकांचे प्रेम मिळवणारी, त्यांच्यावर प्रेम करणारी, हसतमुख असणारी ही जोडी आता मात्र ट्रोलिंगच्या कचाट्यात सापडलीय. हो. याचे कारण म्हणजे रितेश देशमुखची चात्याबरोबरची वागणूक. रितेश असं काही करु शकतो यावर अजूनही काहींचा विश्वास बसत नाही आहे. पण समोर आलेल्या व्हिडीओने हा विश्वास खोडून काढला आहे.
रितेश देशमुख, सध्या ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या तो या चित्रपटाच्या यशामुळे चर्चेत आहे. बहुतेक वेळा पापाराजींसमोर तो चांगले वागतो. इतकेच नव्हे तर पत्नी जिनिलिया आणि त्यांची दोन्ही मुलेही चांगली वागतात. परंतु यावेळी अभिनेत्याने असे काहीतरी केले ज्याने सगळ्यांचा हिरमोड झाला आहे. समोर आलेल्या व्हिडीओने लोक आता त्याला टोमणे मारायची एकही संधी गमावत नाही आहेत. त्याच्या वागणुकीसाठी चांगले आणि वाईटही बोलत आहेत.
आणखी वाचा – ‘अनुपमा’ मालिकेच्या सेटला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी, नेमकं काय झालं?
प्रत्येकाला रितेश देशमुखचे डाउन-टू-अर्थ वागणे आवडते. पण जेव्हा चाहत्यांनी त्याचा हा व्हिडीओ पाहिला तेव्हा सगळेच रागावले. खरंतर, जिनिलिया ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाच्या प्रीमिअरच्या वेळी, पापाराजीने अभिनेत्याला हेरले, यावेळी तो आपल्या पत्नीचा हात धरत होता आणि चाहत्यांच्या गर्दीतून तिला स्क्रीनिंग हॉलमध्ये घेऊन जात होता. या सर्वांच्या दरम्यान, एक लहान मुलगा जोडप्याजवळ आला आणि त्यांनी त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी आपला फोन बाहेर काढला. पण रितेशने मुलाचा हात ढकलला, त्याला खाली खेचले आणि सेल्फी नाकारली आणि त्याच्याकडे न पाहता तो पुढे गेला. यामुळे तो चाहता निराश झाला.
आणखी वाचा – “माझ्याकडे येऊन खूप रडला पण…”, तुषार घाडीगांवकरच्या जवळच्या मित्राने सांगितलं मृत्यूमागील खरं कारण, म्हणाला…
रितेश देशमुखचा हा व्हिडीओ पाहून लोकांनी त्याच्यावर टीका केली. एका नेटकऱ्याने लिहिले, “प्रथमच मला रितेशची वृत्ती आवडली नाही”. एकाने लिहिले, “रितेशकडून कोणतीही आशा नव्हती, ही खूप चुकीची वृत्ती आहे, क्षमस्व. आता मी तुला अनफॉलो करीत आहे”. तर एकाने लिहिले, “अशी कल्पना करा की त्याच्या आई -वडिलांनी त्याला एका फोटोसाठी आपल्याकडे पाठवले असावे आणि तो विनम्रपणे तुमच्याकडे आला आणि सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला, यात त्याचे काय चुकले?”. तर एकाने लिहिले, “हे तुमचे खरे रंग आहेत का?”. तर आणखी एकाने म्हटले, “हाऊसफुल, चित्रपट यशस्वी झाल्यानंतर त्याची वागणूक बदलली”.





