बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित आगामी चित्रपट ‘जवान’ अवघ्या काही दिवसातच जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. शिवाय, चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली असून त्यालादेखील प्रेक्षक जोरदार प्रतिसाद देत आहे. या चित्रपटात अभिनेत्री नयनतारा, विजय सेतुपती, सुनील ग्रोव्हरसारखे अनेक बडे कलाकार झळकणार आहेत. विशेष म्हणजे, शाहरुखच्या या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओकदेखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. (Jawan Movie)
देशभरात सध्या ‘जवान’ चित्रपटाची जोरदार क्रेझ असून त्यानिमित्ताने चित्रपटाची टीम ठिकठिकाणी प्रमोशन करताना दिसत आहे. याच प्रमोशनचा एक भाग म्हणून चेन्नईत चित्रपटाचा प्री-रिलीज इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये शाहरुखने चित्रपटातील सर्वच कलाकारांचे भरभरून कौतुक केले आहे. यावेळी शाहरुखने गिरिजाचेही नाव घेत तिचे कौतुक केले आहे. याच कार्यक्रमातील हा व्हिडिओ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Girija Oak in Jawan Movie)
हे देखील वाचा – Chandramukhi 2 Trailer : भयावह लूक, लक्षवेधी संवाद अन्…; ‘चंद्रमुखी २’चा ट्रेलर प्रदर्शित, कंगना रणौतला पाहून प्रेक्षकही हैराण
गिरीजाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये शाहरुख खान मंचावर उभा राहून बोलताना दिसत आहे. यावेळी तो त्याच्या चित्रपटातील कलाकारांचं कौतुक करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत गिरिजाने एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात ती म्हणते, “या माणसाची कृपा आणि प्रतिष्ठा खूपच कमालीची आहे. मी खूप धन्य आहे, की मला त्याच्याबरोबर स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली. अजूनही हे सगळं स्वप्नवत वाटतं. आतापासून एक आठवडयांनी ‘जवान’ चित्रपटगृहात असेल आणि शाहरुखने दिलेली ही ट्रीट तुम्ही सगळ्यांनी पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.” तिच्या या पोस्टवर मनोरंजन सृष्टीतील मित्रमंडळींसह चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
हे देखील वाचा – ‘अंकुश’ चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला, केतकी माटेगावकरच्या लूकने वेधलं लक्ष
अभिनेत्री गिरीजा ओकने तिच्या अभिनय कारकिर्दीत अनेक चित्रपट, मालिका व नाटकांमध्ये काम केलेलं आहे. ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत सुद्धा ती दिसली आहे.