बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहते. कधी ती तिच्या चित्रपटांमुळे, तर कधी वक्तव्यांमुळे. एरव्ही आपल्या बोल्ड व बिंधास्तपणासाठी ओळखली जाणारी ही अभिनेत्री मात्र आता एका चित्रपटांमुळे जास्त चर्चेत आली आहे. कंगनाची मुख्य भूमिका असलेल्या ‘चंद्रमुखी २’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ज्यात तिच्यासह अभिनेता राघव लॉरेन्स मुख्य भूमिकेत असणार आहेत. हा चित्रपट २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चंद्रमुखी’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. (Chandramukhi 2 Trailer)
पी. वासू दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये ॲक्शन, कॉमेडी, हॉरर, सस्पेन्स अश्या अनेक गोष्टी पाहायला मिळत आहे. हा ट्रेलर प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. अभिनेत्री कंगना रणौतने यात नर्तिकेची भूमिका साकारली आहे. अन्य चित्रपटांपेक्षा तिचा या चित्रपटातील लूक एकदम वेगळा असून तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. मुख्य अभिनेत्याबद्दल बोलायचे झाल्यास राघव लॉरेन्स यात वेट्टय्यान राजाच्या भूमिकेत दिसणार आहे. (Kangana Ranaut)
तीन मिनिटांच्या या ट्रेलरची सुरुवात एका वाड्याने होते. ज्यात एक संयुक्त कुटुंब जे या वाड्यातील समस्या सोडवण्याच्या उद्देशाने आलेले असते. दक्षिण दिशेला चंद्रमुखीचा वास असल्याने हवेलीच्या दक्षिणेकडे जाऊ नये म्हणून कुटुंबाला आधीच कळवले गेले आहे. मात्र त्यात अभिनेत्याची एन्ट्री होते व तिथे त्याची भेट चंद्रमुखीच्या आत्म्याशी होते. तिथे पुढे काय घडतं, ते यात चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
हे देखील वाचा – “करिअर उद्धवस्त कारण…”, ऐश्वर्या रायबरोबरच्या नात्यावर विवेक ओबेरॉयचा २० वर्षांनी खुलासा, म्हणाला, “रिलेशनशिपबाबत…”
पी. वासु यांनी या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. चित्रपटात कंगनासह वाडिवेलू, राधिका सरथकुमार, लक्ष्मी मेनन, महिमा नांबियार, सृष्टी डांगे, रवी मारिया आणि सुरेश मेनन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. येत्या १५ सप्टेंबरला हा चित्रपट तामिळ, हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हे देखील वाचा – चेकइन केल्यानंतर चार बॅग गायब, विमानसेवा देणाऱ्या कंपनीवर भडकला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, म्हणाला, “खूप त्रास होतोय कारण…”
२००५ मध्ये आलेल्या पी. वासु दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. ज्यात दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत आणि ज्योतिका मुख्य भूमिकेत झळकले होते. प्रेक्षकांनी त्या चित्रपटाला जोरदार प्रतिसाद दिला होता. आता १७ वर्षांनी या चित्रपटाच्या सिक्वेलला प्रेक्षक तितकाच प्रतिसाद देणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.