सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘अंकुश’ चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला, केतकी माटेगावकरच्या लूकने वेधलं लक्ष

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 4, 2023 | 10:57 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ankush Movie Teaser

‘अंकुश’ चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला, केतकी माटेगावकरच्या लूकने वेधलं लक्ष

सध्या मराठीमध्ये नवनवीन विषयांवर आधारित चित्रपट प्रदर्शित होत आहेत. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपयांची कमाई केली. आता मराठीमध्ये आणखी एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. ‘अंकुश’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचा धमाकेदार टीझर अखेरीस प्रदर्शित झाला आहे.

अॅक्शन, रोमान्स व मनोरंजनाचा मसाला असलेल्या या चित्रपटाच्या टीझरकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेरीस टीझर समोर आल्यानंतर प्रेक्षक याचं कौतुक करत आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये नवोदीत अभिनेता दीपराज घुले, केतकी माटेगावकरसह सयाजी शिंदे, ऋतुजा बागवे, मंगेश देसाई, चिन्मय उद्गीरकर आदी कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे. शिवाय अॅक्शन सीन्सची झलक कौतुकास्द आहे.

आणखी वाचा – “पैसे नाहीत त्याला…”, मराठी चित्रपटाच्या निर्मात्याने लाखो रुपये थकवल्यामुळे शशांक केतकर भडकला, म्हणाला, “इंडस्ट्रीमधील मोठी नावं…”

राजाभाऊ आप्पाराव घुले निर्मित व निशांत धापसे दिग्दर्शित ‘अंकुश’ चित्रपटाची कथा नामदेव मुरकुटे यांनी लिहिली आहे. या अॅक्शनपॅक चित्रपटातून दीपराज घुले हा नव्या दमाचा अभिनेता पदार्पण करत आहे. त्याच्यासह अभिनेत्री केतकी माटेगावकर, अभिनेते सयाजी शिंदे, मंगेश देसाई, शशांक शेंडे, भारत गणेशपुरे, नागेश भोसले, गौरव मोरे, चिन्मय उदगीरकर, ऋतुजा बागवे, पूजा नायक अशी तगडी स्टारकास्ट आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, भावूक होत म्हणाली, “तू आनंदात जगलीस आणि…”

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

मराठीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अमितराज व चिनार-महेश यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. तर हिंदीतील प्रसिद्ध संगीतकार अमर मोहिले यांनी चित्रपटाला पार्श्वसंगीत दिलं आहे. मंगेश कांगणे, क्षितिज पटवर्धन, समृद्धी पांडे आणि मंदार चोळकर यांनी गीतलेखन केलं आहे. तर आदर्श शिंदे, हृषिकेश रानडे, अमितराज, हर्षवर्धन वावरे, राहुल सक्सेना, नकाश अजीज आणि केतकी माटेगांवकर यांच्या आवाजात चित्रपटाची गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. येत्या ६ ऑक्टोबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल.

Tags: ketaki mategaonkarmarathi actressmarathi movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
amruta khanvilkar emotional

“भेगांमधून रक्त, चालताना त्रास अन्...”, वर्षभरापूर्वी निधन झालेल्या मावशीविषयी बोलताना अमृता खानविलकरला रडू कोसळलं, म्हणाली, “आजारपण...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.