मराठी मनोरंजन क्षेत्रातील गायत्री दातार ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत तिच्याबरोबर सुबोध भावे मुख्य भूमिकेमध्ये होता. यामध्ये दोघांच्याही वयात असलेलं अंतर आणि तरीही असलेलं प्रेम यावर ही मालिका अवलंबून होती. या मालिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते. तिच्या भूमिकेचेदेखील कौतुक केले होते. सध्या ती ‘अबीर गुलाल’ या मालिकेमध्ये दिसून येत आहे. यामध्ये तिची नकारात्मक भूमिका असलेली पाहायला मिळत आहे. या भूमिकेलादेखील चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली आहे. (gayatri datar on suraj chavhan)
सध्या ‘बिग बॉस मराठी’ मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. यामध्ये विविध क्षेत्रातील अनेक स्पर्धक सहभागी झाले आहेत. सध्या यामध्ये सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, आर्या जाधव, पंढरीनाथ कांबळे, निक्की तांबोळी, अरबाज पटेल हे सदस्य सहभागी झाले आहेत. सगळ्यांचाच खेळ खूप पसंत केला जातो. यावरुनच गायत्रीने भाष्य केले आहे. गायत्री ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाली होती. यावरुन तिने या पर्वातील स्पर्धकांवर भाष्य केले आहे.
गायत्रीने नुकतीच ‘इट्स मज्जा’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यामध्ये तिला विचारले की, “तुझा आवडता सदस्य कोणता?”, यावर तिने उत्तर दिले की, “अभिजीत सावंत हा माझा आवडता स्पर्धक आहे. मी नेहमीच त्याला पाठिंबा देईन. तो मध्ये डगमगला होता पण आता चांगला खेळ खेळत आहे. तसेच मला सूरजचा खेळदेखील आवडतो. पण आता सूरजला त्याचा खेळ चांगला खेळण्याची गरज आहे. पहिल्यांदा तो जितका चांगला खेळायचा तितका त्याचा आता खेळ दिसून येत नाही. पण येणाऱ्या आठवड्यात तो चांगला खेळेल अशी अपेक्षा आहे”.
नंतर तिला विचारले की, “तू स्पर्धकांना कोणता सल्ला देशील?”, त्यावर ती हसून म्हणाली की, “मी कोणालाही काहीही सल्ले देणार नाही”. दरम्यान गायत्रीच्या व्यक्तव्याने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.