Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाची चांगलीच चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. यंदाचं हे पर्व स्पर्धकांनी विशेष गाजवलं आहे. यंदाच्या पर्वातील स्पर्धक आपापल्या खेळण्याच्या पद्धतीने स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करताना दिसत आहेत. या स्पर्धकांपैकी एक ताकदवान स्पर्धक म्हणजे अरबाज पटेल. अरबाजने याआधी रोड़ीजसारख्या रिऍलिटी शोमधून प्रेक्षकांची मन जिंकली. यानंतर आता अरबाज ‘बिग बॉस मराठी’ मधून साऱ्यांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे. अरबाजने स्वतःकडे असलेल्या ताकदीच्या बळावर टास्क जिंकले. ताकद वापरल्याने अनेकदा अरबाज ट्रोलही झालेला पाहायला मिळाला.
अरबाजच्या आतापर्यंत संपूर्ण खेळाविषयी त्याच्या वडिलांनी भाष्य केलं आहे. तसंच ‘बिग बॉस मराठी’ची ऑफर आल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय होती? याबद्दल देखील त्यांनी भाष्य केलं. अरबाज पटेलच्या वडिलांनी नुकतीच ‘७ स्टार मराठी’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अरबाजच्या एकंदरीत खेळाविषयी भाष्य केलं. तसंच त्याला काही मोलाचे सल्ले देखील दिले. सुरुवातीला त्यांना विचारलं गेलं की, “‘बिग बॉस मराठी’ची ऑफर आल्यानंतर काय प्रतिक्रिया होती?”.
यावर अरबाजचे वडील उत्तर देत म्हणाले, “जेव्हा अरबाजला ‘बिग बॉस मराठी’ची ऑफर आली तेव्हा आम्हा आई-वडिलांसाठी ही गर्वाची गोष्ट वाटली. कारण महाराष्ट्राचा मोठा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ हा आहे. आज हा शो इतका मोठा झाला आहे त्यामुळे हे मला सांगायला खूप आनंद होतं आहे की माझा मुलगा या शोमध्ये सहभागी आहे. महाराष्ट्राची जनता या शोला भरभरुन प्रोत्साहित करत आहे. त्यामुळे मला खूप गर्व आहे तो ‘बिग बॉस मराठी’मध्ये गेला आहे.”
आणखी वाचा – लेकाला सोडून भारतात परतताना निवेदिता व अशोक सराफ भावुक, म्हणाल्या, “सर्वात कठीण गोष्ट…”
पुढे अरबाजच्या वडिलांना अरबाजच्या खेळाविषयी विचारलं. तेव्हा अरबाजचे वडील म्हणाले, “अरबाज चांगला खेळत आहे. पण मला असं वाटतं, त्याने एकट्याने खेळलं पाहिजे. कारण त्या घरामध्ये ‘बिग बॉस’ जे टास्क देतात त्यामध्ये थोडफार वेगवेगळं खेळलं पाहिजे. अरबाजला स्वतःचा खेळ दाखवण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे त्याने स्वतःचा खेळ चांगला खेळला पाहिजे”.