रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “प्रेम खोटं, तिनेच त्याला गुंतवून ठेवलं आणि…”, निक्कीबरोबरच्या नात्यावर अरबाजच्या वडिलांचं मोठं भाष्य, म्हणाले, “कमिटेड असूनही…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 6, 2024 | 4:11 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 Arbaaz Patel father talked about his son relationship with Nikki Tamboli

Bigg Boss Marathi 5 मधील अरबाज-निक्कीच्या नात्यावर अरबाजच्याचे वडिलांचे भाष्य, खेळाबद्दल लेकाचे कान टोचले अन्...

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’ सुरु झाल्यापासून हा शो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. ‘बिग बॉस मराठी’ सुरु झाल्यापासूनच अरबाज व निक्कीमध्ये जवळीक पाहायला मिळालेली. केवळ प्रेक्षकांनाच नव्हे तर घरातील सदस्यांनादेखील ती जाणवलेली. निक्कीचा विषय आला की, अरबाज नेहमीच हळवा होतो किंवा तिच्यासाठी अगदी जीव तोडून खेळतो. नुकत्याच झालेल्या एका आठवड्यात त्याच्या निक्कीबरोबरच्या दूराव्यामुळे अरबाज फारच बिथरल्यासारखा दिसला. त्याला अभिजीत-निक्की यांची एक टीम पाहवत नव्हती. त्यामुळे त्याची सतत चिडचिड होत होती. त्याला नात्याबद्दल विचारलं तेव्हा त्याने आपण कमिटेड असून गर्लफ्रेंड असल्याचं सांगितलं. (Bigg Boss Marathi 5 Arbaaz Patel father)

कमिटेड असूनही अरबाजचे निक्कीबरोबरचे वागणे अनेकांना खटकत आहे. घरातील सदस्यांनी त्याला याबद्दल जाणीवही करुन दिली आहे. पण दुराव्यानंतरही  अरबाज पुन्हा निक्कीकडे गेल्याचे पाहायला मिळाले. आणि त्याच्या या वागण्यावर घरातील सदस्य चांगलेच नाराज झाले. निक्कीबद्दल अरबाजच्या मनात असलेल्या भावनांवरून रितेश देशमुखनेही त्याची चांगलीच शाळा घेतली होती. अशातच अरबाजच्या वडिलांनी आता निक्की व अरबाज यांच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. ‘7 Star मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अरबाजच्या खेळाबद्दल व त्याच्या निक्कीबद्दलच्या नात्याबद्दल सांगितलं आहे.   

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – सूरज चव्हाण Bigg Boss चा कॅप्टन झाल्यानंतर प्रेक्षकांसह कलाकारही भारावले, म्हणाले, “झुकेगा नहीं, विषय हार्ड…”

याबद्दल अरबाजच्या वाडिलांनी असं म्हटलं आहे की, “अरबाजने मैत्रीचे नाते पुढे नेलं पाहिजे. आज ‘बिग बॉस’सारख्या इतक्या मोठ्या शोमध्ये त्याने कमिटेड असल्याचे म्हटलं आहे. तर त्या विषयावर तो ठाम राहिला पाहिजे. महाराष्ट्राची जनता हे सगळं बघत आहे आणि आपली जनता ही खूप प्रेमळ आहे. त्यामुळे या जनतेला खोटारडापणा बघून आणि ऐकून खूप विचित्र वाटते. कमिटेड असूनही तो घरात जे वागत आहे ते कुठे तरी खोटे वाटत आहे. मलाही वाटतं आहे की, ते त्याने हे करु नये. वैभव व जान्हवीबरोबर त्याने चांगला खेळ खेळला पाहिजे. कारण मैत्रीत पण एक ताकद असते आणि त्याच ताकदीला धरून त्याने निक्कीला सामोरं गेलं पाहिजे. अभिजीतकडे ती वेगळी वागते आणि आरबाजकडे वेगळी… निक्की अरबाजला दूरही करते आणि पुन्हा जवळही घेते. तिने त्याला तिच्या चक्रव्यूहमध्ये गुंतवून टाकलं आहे आणि ते दिसत आहे”.

आणखी वाचा – बाप्पा शब्द चुकीचा उच्चारणाऱ्यांवर भडकली जुई गडकरी, राग व्यक्त करत म्हणाली, “बप्पा नसतं ते…”

यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “अरबाजला असं वाटतं असेल की, निक्की थोडी स्ट्रॉंग प्लेयर आणि गेम चेंजर आहे. पण ती एकीकडे म्हणते की मी इथे गेम खेळायला आली आहे आणि दुसरीकडे घरात कुणी चांगला खेळाडू यावा अशी इच्छाही ती बोलून दाखवते. अभिजीतलादेखील ती बोलली होती की, एक स्त्री म्हणून पुरुषाला प्रभावित कसं करता येईल हे मला माहीत आहे. त्यामुळे मी अरबाजला समजावेन. निक्कीला मी वाईट म्हणणार नाही. ती तिचा गेम खेळत आहे आणि प्रत्येकजण त्यांच्या पद्धतीने उत्तम खेळत आहेत. पण मी अरबाजला सांगू इच्छितो की, अरबाजने स्वत:वर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. स्वत:चा गेम दाखवला पाहिजे. तुझे जे चांगले मित्र आहेत, त्याच्याबरोबर राहून चांगलं खेळलं पाहिजे”.

Tags: Arbaaz Patelbigg boss marathi 5with Nikki Tamboli
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Bigg Boss Marathi 5 new promo Janhavi Killekar angry on Suraj Chavan became the captain of the house.

"तोच का?, मी कॅप्टनच्या लायकीची नाही का?", सूरज कॅप्टन झाल्यानंतर Bigg Boss वरच भडकली जान्हवी, ढसाढसा रडत जाब विचारला अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.