शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुम्ही बेअक्कल लोक…”, मुंबईतील बेशिस्त वाहनचालकांवर संतापली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, म्हणाली, “हा मुर्खपणा…”

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 26, 2024 | 10:03 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actress Gautami Deshpande expressed her anger about the Mumbai traffic and those who break the rules by sharing video

मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडेने मुंबईतील ट्रॅफिकबद्दल व त्या ट्रॅफिकमधून नियम मोडत वाट काढणाऱ्यांबद्दल संताप व्यक्त केला आहे

मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी ही अभिनय क्षेत्रात सक्रीय असतानाच सामाजिक भानही जपतात. सोशल मीडियाद्वारे अनेकदा सामाजिक व राजकीय प्रश्नांना ते वाचा फोडत असतात. सोशल मीडियाचा योग्य वापर करीत ही मंडळी अनेक विषयांवर भाष्य करत असतात. मराठी मनोरंजन सृष्टीतील सामाजिक भान जपणाऱ्या अशा काही कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे अभिनेत्री गौतमी देशपांडे. मुंबईतील ट्रॅफिकची समस्या हा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आहे. इतकच नव्हे तर अगदी सामान्यांपासून ते मोठे कलावंत कायमच या सगळ्यावर भाष्य करत असतात. अनेकांना या ट्रफिकच्या समस्येमुळे बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो. याच ट्रॅफिकवर आता गौतमीने भाष्य केलं आहे. (Gautami Deshpande On Mumbai Traffic)

‘माझा होशील ना’ मालिकेमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे नेहमी चर्चेत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. कधी आपले फोटो तर कधी आपले व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तसंच आजूबाजूच्या घडामोडींवर देखील भाष्य करत असते. नुकताच तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये गौतमीने मुंबईच्या ट्रॅफिकमधील एक कृती पाहून संताप व्यक्त केला आहे. गौतमीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि मुंबईतील ट्रॅफिकबद्दल व त्या ट्रॅफिकमधून नियम मोडत वाट काढणाऱ्यांना तिने बेअक्कल असं म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

आणखी वाचा – Bigg Boss OTT 2 फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाली, “माफ करा…”

या व्हिडीओमध्ये गौतमीने असं म्हटलं आहे की, “मी आता बीकेसी ते विलेपार्लेला जोडणारा जो उड्डाणपूल आहे, तिथे होते आणि पुढे खूप ट्रॅफिक आहे. तर आपल्याकडे काय पातळीची हुशारी आहे. लोकांनी त्या उड्डाणपुलावर यू-टर्न घेतले. अत्यंत वेगाने जिथून गाड्या जात आहे, अशा ठिकाणाहून ते उलटे वन-वे येत आहेत. या अशा लोकांवर काही कारवाई होतं नाही का? किंवा काही केलं जात नाही का? मला काही कळतं नाही. कारण ते अत्यंत रासरोसपणे उड्डाणपुलावरून यू-टर्न घेऊन मागे गेलेले आहेत. ज्यामुळे अपघात होऊ शकतो किंवा अनेक गोष्टी होऊ शकतात”.

आणखी वाचा – 26 November Horoscope : मेष, तूळ, मकर यासह सर्व राशींसाठी मंगळवारचा दिवस आहे फारच विशेष, जाणून घ्या…

यापुढे गौतमीने असं म्हटलं आहे की, “आपल्याला माहिती आहे ना, मुंबईत ट्रॅफिक आहे. तर ट्रॅफिकमध्ये थांबायचं. हा मुर्खपणा करायचा नाही. असं करणारे तुम्ही बेअक्कल लोक आहात”. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कमी मतदान झाल्याबद्दलही तिने पोस्ट शेअर केली होती.  कमी मतदानाबद्दल अभिनेत्रीने नाराजी व्यक्त केली होती आणि आता तिने ट्रॅफिकबद्दल आपला संताप व्यक्त केला आहे.

Tags: gautami deshpandeGautami Deshpande On Mumbai Trafficmarathi actress
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Paaru Marathi Serial Update

Paaru Marathi Serial : अनुष्काच्या येण्याने आदित्य व अहिल्यादेवींच्या नात्यात फूट, आई-मुलालाही वेगळं केलं अन्…; मालिकेत मोठा ट्विस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.