टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस ओटीटी २’ फेम आशिका भाटियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीचे वडील राकेश भाटिया यांचे निधन झाले आहे. वडिलांच्या निधनाची माहिती खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्रीने एक दु:खद पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्रीने वडिलांबरोबरचा एक जुना फोटो शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. (Aashika Bhatia Father Passed Away)
वडिलांच्या निधनानंतर आशिकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. वडिलांबरोबरचा अगदी जुना फोटो इन्स्टा स्टोरीवर शेअर करत अभिनेत्रीने “मी तुझ्यावर प्रेम करतो, मला माफ करा बाबा” असे भावनिक कॅप्शन लिहिले आहे. वडिलांच्या निधनानंतर ती उद्ध्वस्त झाली असून तिला मोठा धक्का बसल्याचे आशिकाच्या पोस्टवरून स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आशिका भाटियाचे वडील राकेश भाटिया यांनी २५ नोव्हेंबर २०२४ रोजी अखेरचा श्वास घेतला. ते व्यापारी होते.
आणखी वाचा – 26 November Horoscope : मेष, तूळ, मकर यासह सर्व राशींसाठी मंगळवारचा दिवस आहे फारच विशेष, जाणून घ्या…
आशिकाच्या वडिलांचा मृत्यू कसा झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आशिकाचे आई-वडील वेगळे झाले होते. आशिका लहान असताना तिचे वडील आणि आई मीनू भाटिया यांचा घटस्फोट झाला होता. पण वडिलांनी मुलीला प्रत्येक पावलावर साथ दिली. आशिका भाटियाने लहान वयात बालकलाकार म्हणून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. आशिकाने ‘मीरा’ या शोमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
आणखी वाचा – सह अभिनेत्रींच्या हातावर थुंकायचा आमिर खान, करायचा किळसवाणा प्रकार कारण…
यानंतर ती सोनी टीव्हीच्या ‘परवरिश कुछ खट्टी कुछ मेथी’ या शोमध्ये दिसली होती, ज्यामध्ये तिच्या पात्राचे नाव ‘गिन्नी’ होते. पुढे तिने सलमानच्या ‘बिग बॉस ओटीटी २’ या शोमध्ये भाग घेतला होता. यामध्ये ती वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून दिसली. आशिका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि ती स्वतःशी संबंधित पोस्ट शेअर करत असते. अभिनयाबरोबर ती तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत राहत असते.