श्वेता शिंदे ही मराठीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सध्या श्वेता निर्मिती क्षेत्रात सुद्धा बरेच वेगवेगळे प्रयोग करताना दिसत असते. ‘लागीर झालं जी’, ‘देवमाणूस’, ‘मिसेस मुख्यमंत्री’ यांसारख्या दर्जेदार मालिकांची निर्मिती करून प्रेक्षकांचं तिने मनोरंजन केलं. निर्माती बनण्याआधी ती उत्तम अभिनेत्री म्हणून सिनेसृष्टीत कार्यरत होती. निर्मितीक्षेत्रात आल्यानंतर श्वेताने अभिनयक्षेत्रातून ब्रेक घेतला होता. मात्र अभिनयाची आवड जोपासण्यासाठी तिने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. (Shweta Shinde On Family)
श्वेताने ‘आरपार’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या खासगी आयुष्याबाबत काही खुलासे केले. यादरम्यान ती अगदी दिलखुलासपणे बोलली. श्वेता म्हणाली, “प्रेग्नंसी हा माझ्यासाठी काही आनंदाचा विषय नव्हता. मी जेव्हा प्रेग्नेंट झाले तेव्हा मला खूप मोठा शॉक बसला होता. माझ्या हातून बरीच कामं निघून गेली. त्यादरम्यान मी डिप्रेशनमध्ये गेले. मला मुलगी झाली. तिचं नाव वामिका आहे. एकेकाळी मला असं वाटत होत की, मी का प्रेग्नेंट झाले ते मी हेचं जगातलं सगळ्यांत अंतिम सुख आहे असं मला वाटू लागलं” असं ती म्हणाली.
यापुढे ती, “प्रत्येक लग्नामध्ये पहिली तीन वर्ष तुम्ही सासूबरोबर एकत्र सगळं सांभाळलात तर संपूर्ण आयुष्य तुमचं सुखकर होईल. मला काय असं वाटतं की, आपली सासू आपल्याबरोबर कशी का असेना पण तुमचं जे मुल असतं त्याच्याकडे त्यांचा बघण्याचा दृष्टीकोन वेगळाच असतो. आपण स्वतःला शुन्य किंमत द्यावी आणि आपल्या मुलाबरोबर सासूचं असलेलं नातं पाहून गप्प बसावं. तुमच्या मुलांना एकत्र कुटुंबामध्ये राहणं कळणं खूप महत्त्वाचं आहे. मला एकच मुलगी” असंही म्हणाली.
यापुढे तिने खासगी आयुष्याबाबत बोलताना म्हणाली, “आम्ही दुसऱ्या मुलासाठी प्रयत्न करत होतो. पण ते झालं नाही. सरोगसी पर्यंत पोहोचलो पण तेही यशस्वी झालं नाही. सरोगसीचा प्रयत्न यशस्वी झाला असता तर मराठीमधील पहिली सरोगसीद्वारे आई होणारी अभिनेत्री मी ठरले असते”. श्वेताच्या बोलण्यामधून तिला एकत्र कुटुंब पद्धत किती आवडते? हे दिसून येतं.