‘देव माणूस’, ‘मिसेस मुख्यमंत्री’, ‘लागीर झालं जी’ या मालिकांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. या मालिकांमार्फत निर्मितीक्षेत्रात नाव गाजवत असलेली अभिनेत्री म्हणजे श्वेता शिंदे. श्वेताने या आशयघन मालिका आणून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. श्वेता आता जरी निर्माती म्हणून काम करत असली तरीही तिने यापूर्वी अनेक उत्कृष्ट मालिका व चित्रपटांमध्ये काम केले होते. श्वेता नेहमीच वेगवेगळ्या मुलाखतीद्वारे आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य करत असते. अशातच श्वेताने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान तिच्या कुटुंबाबद्दल भाष्य केलं. (Shweta Shinde On Family)
श्वेताने ‘आरपार’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या खासगी आयुष्याबाबत काही खुलासे केले. यादरम्यान ती अगदी दिलखुलासपणे बोलली. श्वेता म्हणाली, “माझी तीन घरं आहेत. मुंबईमध्ये एक घर आहे. तिथे फक्त मी चॅनलबरोबर मीटिंग असतील तरच जाते. एक रात्र राहते आणि परत निघते. कारण त्या घरामध्ये मी एकटीच राहते. पुण्यामध्ये घर आहे जे माझं सासर आहे. तिथे माझं एकत्र कुटुंब आहे. मी एकत्र कुटुंबामध्ये राहते. तिथे माझी नेहमीच कसरत असते”.
यापुढे ती म्हणाली, “साताऱ्यामध्ये एक घर आहे ते माझ्या आईचं घर आहे. तिथे गेली की, मी आईच्या घरी राहते. अशी ती तीन घरं आहेत. तीन घरांमध्ये माझं येणं-जाणं असतं. आम्ही घरामध्ये दहा जणं एकत्र राहतो. मला असं वाटतं की, तुम्ही तुमची विचार करण्याची पद्धत थोडी बदलली तर एकत्र कुटुंबामध्ये राहणं इतकं अवघड नाही. मी लग्न करुन आल्यानंतर १६ वर्षांपूर्वी माझ्या सासूबाई जशा होत्या तशा त्या आज नाहीत. या १६ वर्षांमध्ये सासूबाई आणि माझ्यामध्ये एक समजुतदारपणा आला आहे”.
एकत्र कुटुंबाबाबत भाष्य करत ती, “प्रत्येक लग्नामध्ये पहिली तीन वर्ष तुम्ही सासूबरोबर एकत्र सगळं सांभाळलात तर संपूर्ण आयुष्य तुमचं सुखकर होईल. मला काय असं वाटतं की, आपली सासू आपल्याबरोबर कशी का असेना पण तुमचं जे मुल असतं त्याच्याकडे त्यांचा बघण्याचा दृष्टीकोन वेगळाच असतो. आपण स्वतःला शुन्य किंमत द्यावी आणि आपल्या मुलाबरोबर सासूचं असलेलं नातं पाहून गप्प बसावं. तुमच्या मुलांना एकत्र कुटुंबामध्ये राहणं कळणं खूप महत्त्वाचं आहे. मला एकच मुलगी” श्वेताच्या बोलण्यामधून तिला एकत्र कुटुंब पद्धत किती आवडते? हे दिसून येतं” असंही म्हणाली.