नव्या वर्षाच्या आगमनासाठी सामान्य लोकांसह कलाकार मंडळीही सज्ज झाली आहेत. काही कलाकार आपल्या कुटुंबियांबरोबर नव्या वर्षाचं सेलिब्रेशन करत आहेत. तर काही कलाकार मित्र मंडळींबरोबर सुट्ट्या एण्जॉय करत आहेत. दरम्यान अनेक कलाकारांनी २०२३मधील त्यांच्या काही आठवणींना उजाळा दिला. २०२३मध्ये काय कमावलं, काय गमावलं, कोणते दुःखद व सुखद क्षण होते याबाबत कलाकार मंडळी सोशल मीडियाद्वारे व्यक्त होत आहेत. अशामध्येच अमृता खानविलकरने शेअर केलेली पोस्ट विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून अमृता एका आजाराचा सामना करत आहे. याबाबत तिने स्वतःच खुलासा केला. (Amruta Khanvilkar Social Media Post)
इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे अमृताने तिचा एक फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करत तिने तिच्या आजारापणाबाबत खुलेपणाने सांगितलं आहे. तिची प्रकृती आता ठिक आहे. पण गेल्या दोन महिन्यांच्या आजारपणात तिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. पोस्ट शेअर करत अमृताने तिला होणारा त्रास तसेच यामधून ती आता बाहेर आली असल्याचं सांगितलं.

अमृता म्हणाली, “गेल्या दोन महिन्यांमध्ये डेंग्यु व Bronchitis या आजाराशी मी सामाना केला. दरम्यानच्या काळामध्ये प्रत्येक क्षण मला थकवणारा होता. मला असं वाटलं की, मी कोणत्या तरी नव्या प्रसंगामध्ये अडकले आहे. पण याकाळामध्ये माझा धीर अधिक वाढला. मला असं वाटतं की, तुम्ही जसे आहात तसेच राहा इतर लोक तुमचं आपोआप अनुकरण करतील. जर तुम्ही कष्ट करत असाल तर विश्वास ठेवा सगळं काही ठीक होईल”.
आणखी वाचा – “ती गेली तेव्हा…”, आस्ताद काळेच्या आईचं निधन, अंगावर काटा आणणारी पोस्ट, म्हणाला, “अजूनही रडलो…”
अमृताने तिच्या आजाराविषयी माहिती देत सगळ्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. अमृताच्या या पोस्टनंतर ती आता आजारामधून बरी झाली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शिवाय ती विविध ठिकाणी भटकंती करत असते. यादरम्यानचे तिचे बरेच व्हिडीओ तिने तिच्या युट्युब चॅनलद्वारे शेअर केले आहेत. आता ती नव्या वर्षात अधिक जोमाने काम करण्यास सज्ज झाली आहे.