मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख. ‘बिग बॉस’मराठीमुळे ही जोडी चर्चेत आलेली पाहायला मिळाली. ‘बिग बॉस’मराठीच्या घरात अमृता व प्रसाद यांची भेट झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. अमृता व प्रसाद यांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली कुठेही दिली नाही. ‘बिग बॉस’नंतर बरेचदा ही जोडी एकत्र स्पॉट झालेली दिसली तेव्हा त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. मात्र त्यांनी तेव्हा याबाबत काहीच भाष्य केलं नाही. थेट साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत त्यांनी त्यांच्या नात्याची कबुली दिली. (Amruta Deshmukh And Prasad Jawade)
प्रसाद व अमृताच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे आणि लग्नापुर्वीच्या विधींचे अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले. प्रेक्षकांनी, चाहत्यांनी या व्हिडीओ व फोटोंवरुन दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. प्रसाद व अमृता दोघेही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच दोघेही काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतात. विशेषतः दोघेही ट्रेंडिंग रील व्हिडीओ बनवतात.
लग्नानंतर दोघांनीही कामाला सुरुवात केली आहे. अमृता सध्या रंगभूमीवर व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. तर प्रसाद झी मराठी वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. सध्या मालिकेच्या शुटिंगनिमित्त प्रसाद साताऱ्यात आहे. त्यामुळे तो घरापासून, बायकोपासून दूर आहे. घरापासून, बायकोपासून दूर असलेला प्रसाद त्यांना मिस करत असतो. वेळात वेळ काढून तो बायकोला भेटायला येतो. बरेचदा अमृता प्रसादबरोबर साताऱ्यात येते. अशाप्रकारे दोघेही एकमेकांना वेळ देतात.
अशातच अमृताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अमृताने प्रसादचा एक अतरंगी धमाल, मस्ती करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यांत प्रसाद अमृताला व्हिडीओ कॉल लावून अतरंगी डान्स करताना दिसत आहे. विचित्र स्टेप्स करत प्रसादचा हा डान्स व्हिडीओ शेअर करत, “दुपारचे Booty कॉल्स” असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. सदर व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रसादने दिलेल्या हावभावांचे कौतुक केले आहे.