शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“राजकीय पुढारी रीलस्टार्सचे पुरस्कार सोहळे ठेवतात अन्…”, योगेश शिरसाट यांचा रोख नेमका कोणाकडे?, म्हणाले, “त्यांचे फॉलोअर्स…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 4, 2024 | 5:52 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Chala hawa yeu dya fame Yogesh Shirsat talked about social media influencers.

"राजकीय पुढारी रीलस्टार्सचे पुरस्कार सोहळे ठेवतात अन्...", योगेश शिरसाट यांचा रोख नेमका कोणाकडे?, म्हणाले, "त्यांचे फॉलोअर्स..."

झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या शोने गेली दहा वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ‘चला हवा येऊ द्या’ या शोमुळे अनेक कलाकारांना लोकप्रियता मिळाली. यांमध्ये भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे यांसारख्या अनेक कलाकारांचा समावेश आहे. याच शोमध्ये काही दिवसांनी नव्याने सहभागी झालेला अभिनेता व लेखक म्हणजे योगेश शिरसाट. योगेशने आजवर या कार्यक्रमामध्ये विविध भूमिका साकारल्या. त्याचबरोबर रुपेरी पडद्यावरही त्याने साकारलेल्या भूमिकांचं कौतुक झालं.

अभिनय करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता त्याच्या लेखनशैलीने प्रेक्षकांना विचार करायला भाग पडायला लावतो. योगेश त्याच्या लिखाणाने आजवर अनेक सामाजिक व राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. अशातच योगेशने नुकतीच ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. तेव्हा त्यांना सध्या सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर्सना अधिक महत्त्व दिले जाते. याविषयी त्यांचं मत विचारण्यात आलं.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

याचं उत्तर देत योगेश शिरसाट यांनी असं म्हटलं की, “सगळेच रील स्टार्स असे नाही आहेत. काही रील स्टार्स छोट्या पडद्यावर येऊनही चांगलं काम करतात. पण प्रत्येक जण आपपला फायदा बघत असतो. कोणत्याही चॅनलला वाटतं की या रील स्टारला घेऊन आपण एखादी मालिका केली तर त्यांना असं वाटतं की त्या रीलस्टार्सचे फॉलोअर्स आपल्या टीआरपीकडे वळतील असं त्यांना वाटत असतं. पण असं काही नसतं.”

आणखी वाचा – “फॉलोअर्स पाहून काम गेलं अन्…”, योगेश शिरसाट यांचा मोठा खुलासा, म्हणाले, “चित्रीकरणाच्या दोन दिवसांपूर्वी…”

यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “आजकाल बरेच राजकीय पुढारी रीलस्टार्सचे पुरस्कार सोहळे ठेवायला लागले आहेत. त्यांना असं वाटतं की, त्या रीलस्टार्सचे फॉलोअर्स आपले फॉलोअर्स होतील. मग ते आपल्या मतपेटीत परावर्तित होतील. त्यांचा हा चांगला उद्देश आहे, तसं झालं तर चांगलीच गोष्ट आहे. पण हे असं काही होईल असं मला तरी वाटत नाही.”

आणखी वाचा – Video : ‘तू दूर का…’, ओंकार भोजनेची कविता ऐकून उपस्थित कलाकार मंडळीही भारावली, जोरदार प्रतिसाद अन्…; व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, योगेश शिरसाट यांनी ‘मज्जाचा अड्डा’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात त्यांनी मनमुरादपणे संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्राबद्दलही भाष्य केले. त्याचबरोबर अभिनय व लेखन क्षेत्राविषयीचे अनुभवही व्यक्त केले.   

Tags: marathi actormarathi entertainment newsyogesh shirsat
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Ranbir Kapoor's Ramayana shoot started, the sets have been built in Mumbai see the details

रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात, अयोध्या उभारणार, सेटसाठी तब्बल इतका खर्च

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.