शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अमृता देशमुखच्या पहिल्या मंगळागौरीचा शाही थाट, नवऱ्याने दिली मोठी साथ, म्हणाली, “असा उत्साही नवरा कुठेही…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 21, 2024 | 2:41 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
amruta deshmukh first manglagaur

अमृता देशमुखने नवऱ्याबरोबर साजरी केली पहिली मंगळागौर

अमृता देशमुख व प्रसाद जवादे ही मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय जोडी आहे. दोघेही ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात एकत्रितपणे दिसून आले होते. या शोदरम्यान त्यांच्यामध्ये घट्ट मैत्री झाली. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी काही महिन्यातच साखरपुडा उरकला आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी नोव्हेंबरमध्ये एकमेकांशी लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर दोघांचेही अनेक व्हिडीओ व फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळतात. (amruta deshmukh first manglagaur)

अमृता व प्रसाद यांचा लग्नसोहळा १८ नोव्हेंबरला थाटामाटात पार पडला. लग्नसोहळ्यासाठी अनेक कलाकारांनीदेखील उपस्थिती दर्शवली होती. आता लग्नानंतरची पहिलीच मंगळागौर अमृताने साजरी केली. पहिल्या मंगळागौरसाठी प्रसादने देखील व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून अमृतासाठी उपस्थित राहिला. मंगळागौरचे काही फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

आणखी वाचा – सुरुची अडारकराची लग्नानंतरीच पहिली मंगळागौर, नटून-थटून नवऱ्यानेही दिली साथ, साधेपणाचं होत आहे सर्वत्र कौतुक

View this post on Instagram

A post shared by Amruta Deshmukh (@khwabeeda_amruta)

अमृताने प्रसादबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने लिहिले की, “नटून थटून मंगळागौर साजरी केली. प्रसादसारखा उत्साही नवरा कुठेही मिळणार नाही. ज्याच्यासाठी हे व्रत केले त्याची या सोहळ्याला इतकी छान साथ मिळते तेव्हा आनंद अजूनच द्विगुणित होतो”. दरम्यान शेअर केलेल्या फोटोमध्ये अमृताच्या लूकनेदेखील सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. यावेळी अमृताने मंगळागौरसाठी खास शाही लूक केला होता. तिने लव्हेंडर रंगाची साडी नेसली होती. तसेच त्यावर साजेसे असे दागिनेदेखील घातले होते. केसांचा अंबाडा व नाकात पारंपरिक नथ यामुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसून आले होते.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi :  “तुला आताच मारेन”, वैभवची आर्याला धमकी, अंगावर ओरडत राहिला अन्…; हे वागणं शोभतं का?

याचबरोबर प्रसादने देखील फिकट पांढऱ्या रंगाचा कुर्ता व धोतर परिधान केले होते. या लूकमध्ये तो खूपच राजबिंडा दिसून येत होता. दोघांच्याही लूकला सगळ्यांची पसंती मिळाली आहे. तसेच तिचे मंगळागौर पूजनाचे फोटोदेखील समोर आले असून महिलांसह ती पूजा करताना दिसत आहे.

Tags: amruta deshmukhmanglagaurprasad jawade
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Anushka sharma troll after banglore stampede
Entertainment

“खोटं रडू नकोस, इतके पैसे कमावले पण…”, बंगळूर चेंगराचेंगरीवर पोस्ट करताच अनुष्का शर्मा ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

जून 6, 2025 | 2:30 pm
 Celebs Live In Rented Houses
Entertainment

कोट्यवधी कमावतात तरीही कलाकार भाड्याच्या घरात का राहतात?, कारण ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…

जून 6, 2025 | 1:30 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 daily update nikki tamboli and irina rudakova fight new promo shared on instagram

Bigg Boss Marathi : “विकून खाशील, तुझ्या देशाने रिजेक्ट केलं म्हणून…”, इरिनावर निक्कीचे आरोप, दमदाटी सुरुच

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.